Modi Government | विना सरकारी नोकरीसुद्धा मोदी सरकार सर्वांना देतंय पेन्शन, जाणून घ्या कशी मिळवावी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Modi Government | सरकारी नोकरी करणार्‍यांना सर्वात मोठा लाभ तेव्हा होतो जेव्हा वृद्धपकाळात पेन्शन मिळते. मात्र, आता मोदी सरकार (Modi Government) कामगार, मजूर, खासगी कंपनीचे कर्मचारी, व्यापारी इत्यादींपासून खासगी क्षेत्रात काम करणार्‍यांना सुद्धा पेन्शन (Pension) सुविधा देत आहे.

यासाठी केंद्र सरकारच्या अटल पेन्शन योजनेत (Atal Pension Yojana) गुंतवणूक करून लोक 60 वयानंतर वृद्धत्वात पेन्शनचा लाभ घेऊ शकतात. यात पती-पत्नी दोघांनी गुंतवणूक केली तर 60 वर्षानंतर दोघांनी मिळून 10,000 रुपये महिन्याची पेन्शन मिळते.

 

APY योजनेत सहभागी होण्याच्या अटी :

योजनेत सहभागी होण्यासाठी किमान वय 18 वर्ष आणि कमाल 40 वर्ष असावे.
यामध्ये वयाच्या हिशेबाने मंथली प्रीमियम ठरलेला असतो.
सर्वात कमी प्रीमियम 18 वर्षाच्या वयात योजनेचा लाभ घेतल्यास द्यावा लागतो.
सर्वात जास्त प्रीमियम 30 वर्षाच्यानंतर द्यावा लागतो.
कारण पेन्शनची किमान रक्कम 1000 मासिक आणि कमाल 5000 मासिक ठरवलेली आहे.
प्रीमियम देताना पेन्शनच्या रक्कमेला आधार बनवले जाते.

 

जर पेन्शनधारकाचा मृत्यू झाला तर…

पेन्शन घेत असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास ती पेन्शन नॉमिनीला आयुष्यभर मिळते.
योजनेत पेन्शन प्लान घेतल्यास इन्कम टॅक्समध्ये सेक्शन 80 CCD (1B) च्या अंतर्गत 50,000 पर्यंत इन्कम टॅक्स डिडक्शन दिले जाते.

 

जर 60 वर्षापूर्वी धारकांचा मृत्यू झाला तर…

पेन्शनचा लाभ घेणार्‍याचा मृत्यू 60 वर्षाच्या अगोदर झाला तर त्या स्थितीत सुद्धा पेन्शन त्याच्या नॉमिनीला दिली जाईल. कोणत्याही बँकेत किंवा पोस्टात खाते उघडून याचा लाभ घेता येऊ शकतो.

 

Web Title : Modi Government | apy central government giving pension everyone even without government job

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Laptop Charging | तुमचा लॅपटॉप चार्ज होत नाही? राहा टेन्शन फ्री, जाणून घ्या दुरुस्तीची सोपी पद्धत

Gold Price Today | सोन्याच्या किमतीत पुन्हा घसरण, आता 8994 रुपये झाले ‘स्वस्त’; जाणून घ्या आजचे नवीन दर

Pune Metro Traffic | मेट्रोच्या कामासाठी संभाजी पुल (लकडी पुल) 20 दिवस दररोज रात्री 7 तास राहणार बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग