वाहन नोंदणीचे नियम होतील कठोर, मोदी सरकारनं उचललं ‘हे’ पाऊल, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : येत्या काळात नवीन वाहनांच्या नोंदणीचे नियम कठोर होऊ शकतात. वास्तविक, केंद्र सरकार वाहन मालकीसाठी आवश्यक असलेल्या ‘फॉर्म 20’ मध्ये बदल करण्याची तयारी करत आहे. त्याबद्दल तपशीलवार जाणून घेऊया…

वृत्तसंस्था पीटीआयच्या म्हणण्यानुसार, सरकारने एक ड्राफ्ट अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेद्वारे फॉर्म 20 मध्ये दुरुस्तीसाठी सूचना मागविण्यात आल्या आहेत. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘लोक नोंदणीमध्ये वाहनची मालकी योग्यरित्या नोंदवत नाहीत हे मंत्रालयाच्या निदर्शनास आले आहे.’

निवेदनात पुढे असेही म्हटले आहे की मालकीचे प्रकार स्पष्टपणे सूचित करण्यासाठी फॉर्म 20 मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. उदाहरणार्थ स्वायत्त संस्था, केंद्र सरकार, चॅरिटी ट्रस्ट, ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूल, शैक्षणिक संस्था, स्थानिक प्रशासन, एकापेक्षा जास्त मालक, पोलीस विभाग इत्यादींचा तपशीलवार मालकीचा प्रकार स्पष्ट करण्यासाठी दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव आहे.

दुरुस्तीच्या माध्यमातून हे सुनिश्चित केले जाईल की मोटार वाहन खरेदी/ मालकी/ संचालनासाठी शासनाच्या विविध योजनांतर्गत अपंगांना जीएसटी व इतर सवलतींचा लाभ देण्यात येणार आहे. दरम्यान काही काळापासून सरकारने सातत्याने वाहनांच्या नोंदणीसाठी अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत.