Modi Government | दररोज 7 रूपयांची बचत करून दरमहा मिळवा 5000 रूपये, जाणून घ्या मोदी सरकारची ‘ही’ जबरदस्त स्कीम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकार (Modi Government) कडून सुरू करण्यात अलेली अटल पेन्शन योजनेच्या (Atal Pension Yojana) सदस्यांची संख्या 2.23 कोटीपेक्षा जास्त झाली आहे. मोदी सरकार (Modi Government) च्या या महत्वाकांक्षी योजनेंतर्गत रोज 7 रुपये वाचवून 60 वर्षाच्या वयानंतर दरमहिना 5,000 रुपयांची पेन्शन (60 हजार रुपये वार्षिक पेन्शन) प्राप्त करू शकतात.

तर, सरकारने आता मोठा निर्णय घेताना या पेन्शन स्कीममध्ये (Pension scheme) कॉन्ट्रिब्यूशन करण्याची 30 जूनपर्यंतची सवलत दिली आहे. या योजनेच्या सबस्क्रायबरपैकी बहुतांश कमी उत्पन्न गटाचे आहेत. लॉकडाऊनपासून सर्वात वाईट परिणाम याच वर्गावर झाला आहे. पेन्शन फंड नियामक PFRDA ने याबाबत एक सर्क्युलर जारी केले आहे.

कोविड-19 मुळे मागील आठवड्यात पीएफआडीएने NPS सबस्क्रयबर्सच्या खात्यात जमा रकमेतून एका मर्यादेपर्यंत पैसे काढण्याची मंजूरी दिली होती. 31 मार्च, 2020 पर्यंत एनपीएस आणि एपीवाय अंतर्गत एकुण सबस्क्रायबर्सची संख्या 3.46 कोटी होती. मार्च, 2020 पर्यंत या योजनेंतर्गत एकुण असेट अंडर मॅनेजमेंट 4.17 कोटी रुपये होती.

 

काय झाला बदल –

लॉकडाऊनचा सर्वात जास्त परिणाम याच वर्गावर झाला आहे.
पेन्शन फंड नियामक पीएफआरडीएने याबाबत एक सर्क्युलर जारी केले आहे.
हे पाहता योजनेसाठी (Modi Government) ऑटो डेबिट सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

अटल पेन्शन योजना देशातील आर्थिकदृष्ट्या मागास लोकांना पेन्शन देण्याच्या हेतूने सुय केली आहे.
या पावलाचा अर्थ हा आहे की, 30 जूनपर्यंत या स्कीममध्ये गुंतवणूक करणार्‍यांच्या खात्यातून कॉन्ट्रिब्यूशनची रक्कम कापली जाणार नाही.

याशिवाय जर अटल पेन्शन योजनेच्या खातेधारकांनी आपल्या खात्यांमधून असे कापले गेले नाही म्हणजे नॉन-डिडक्टेड APY कॉन्ट्रिब्यूशनसह एक जुलै 2020 पासून 30 सप्टेंबर 2020 च्या दरम्यान जमा केले तर त्यांच्याकडून विलंब झाल्यास कोणतेही दंडात्मक व्याज घेतले जाणार नाही.

जाणून घेवूयात या योजनेसंबंधी सर्व गोष्टी :
(1) नॅशनल सिक्सुरिटीज डिपॉझिटरी (NSDL) च्या वेबसाइटनुसार 18 वर्षापासून 40 वर्षापर्यंतच्या वयाचे लोक या योजनेत सहभागी होऊ शकतात.
मात्र, या योजनेचा लाी ते लोकच घेऊ शकतात जे इन्कम टॅक्स स्लॅबच्या बाहेर आहेत.

(2) APY योजनेत एखादी व्यक्ती 18 व्या सहभागी होत असेल आणि वयाच्या 60 व्या वर्षानंतर 1,000 रुपये मासिक पेन्शन पाहिजे
असेत तर त्यास 60 वर्षाच्या वयापर्यंत प्रत्येक महिन्याला 42 रुपये खर्च करावे लागतील.
जर, या व्यक्तीला 5,000 रुपये मासिक पेन्शन हवी असेल तर त्यास 60 वर्षांचा होईपर्यंत प्रति महिना 210 रुपये जमा करावे लागतील.

(3) कधी मिळेल पेन्शन –
जर 60 वर्षाच्या अगोदर किंवा नंतर सदस्याचा मृत्यू झाल्यास, पेन्शनची रक्कम पत्नीला मिळेल.
जर सदस्य आणि पत्नी दोघांचा मृत्यू झाला तर सरकार नॉमिनीला पेन्शन देईल. (Modi Government)

 

Web Title :- Modi Government | atal pension yojana get 5000 rupees every month by saving 7 rupees daily check details here

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

IND Vs NZ | न्यूझीलंडविरुद्धच्या T20 सिरीजपूर्वी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने सांगितला टीम इंडियाचा ‘मास्टर प्लॅन’

Sanjay Raut | संजय राऊतांचा कंगनाला टोला; म्हणाले – ‘त्यांना नशेचा पुरवठा कोण करतं, NCB ने तपास करावा’

Kangana Ranaut | कंगना राणावत पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात ! महात्मा गांधी यांच्याबाबत म्हणाली…