Modi Government | मोदी सरकारच्या ‘या’ योजनेचा 31 मार्चपर्यंत मिळेल लाभ; जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया अन् कोणाला होणार फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारद्वारे (Modi Government) राबवण्यात येत असलेली आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेंतर्गत (Atmanirbhar Bharat Rojgar Yojana) नोंदणी सुविधा 31 मार्च, 2022 पर्यंत वाढवली आहे. अगोदर रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख 30 जून 2021 होती, परंतु आता ती वाढवून पुढील वर्षी 31 मार्च करण्यात आली आहे. (Modi Government)

 

labour.gov.in वर लॉगइन करून आत्मानिर्भर भारत रोजगार योजनेबाबत अधिक माहिती घेतली जाऊ शकते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) अलिकडेच आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ABRY च्या अंतर्गत रजिस्ट्रेशन सुविधा वाढवण्याबाबत ट्विट केले आहे. ट्विटमध्ये म्हटले आहे की, ABRY च्या अंतर्गत नोंदणीची सुविधा 31.03.2022 पर्यंत वाढवली आहे.

 

असे करू शकता रजिस्ट्रेशन
एआरबीवाय अंतर्गत नोंदणीची अंतिम तारीख 31 मार्च, 2022 पर्यंत वाढवली आहे. ईपीएफ आणि एमपी कायदा 1952 च्या अंतर्गत रजिस्टर होणारे नवीन कर्मचारी आणि नवीन संस्था 31 मार्च, 2022 पर्यंत नोंदणीसाठी पात्र आहेत.

अधिक माहिती आणि नोंदणी माहितीबाबत, ईपीएफओची अधिकृत वेबसाइट epfindia.gov.in वर लॉगइन करावे लागेल. नंतर इच्छुक व्यक्तींना ABRY टॅबवर जावे लागेल.

ईपीएफमध्ये केंद्र सरकारकडून मदत
त्यांनी सांगितले की, सुरक्षा लाभासह रोजागाराचे निर्मितीसाठी कंपन्याना प्रोत्साहित करणे आणि रोजगार पुन्हा रूळावर आणण्यासाठी 10 ऑक्टोबर 2020 पासून आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. (Modi Government)

त्यांनी म्हटले की, ईपीएफओकडून चालवली जात असलेली ही योजना एम्प्लॉयरवरील आर्थिक दबाव कमी करते. सोबतच त्यांना आणखी जास्त कर्मचारी हायर करण्यासाठी सुद्धा प्रोत्साहित करते.

 

Web Title :- Modi Government | atmanirbhar bharat rojgar yojana registration extended benefits march 31 know more

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

District Central Cooperative Bank | पुण्यासह ‘या’ 4 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुका लवकरच; हाय कोर्टाची परवानगी

Hingoli Accident News | नोकरीच्या पहिल्याच दिवशी घरी परतताना झालेल्या अपघातात 2 चुलतभाऊ ठार

Life Certificate | पेन्शनर्ससाठी मोठी खुशखबर ! ‘या’ महत्वाच्या कागदपत्राबाबत मिळाला मोठा दिलासा

Nawab Malik | ‘अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्याचे कटकारस्थान सुरू, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे तक्रार करणार’ – नवाब मलिक

Rakesh Jhunjhunwala | राकेश झुनझुनवाला यांनी ‘या’ स्टॉकमधून 1 आठवड्यात गमावले 753 कोटी रुपये; तुम्ही तर घेतला नाही ना?