Coronavirus : ‘कोरोना’बाबत मोदी सरकारची कारवाई, पॅरासिटामॉलसह ‘या’ 12 औषधांच्या निर्यातीवर बंदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) मंगळवारी अनेक अ‍ॅक्टिव्ह फार्मास्यूटिक इन्ग्रेडिएंट (एपीआय) आणि या एपीआयपासून तयार फॉर्म्यूलेशनच्या निर्यातीवर बंदी आणली आहे. या एपीआयमध्ये पॅरासिटामॉल व टिनिडाजोलचा सुद्धा समावेश आहे. देशातील या औषधांच्या कमतरतेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सने ही बंदी तात्काळ लागू झाली असल्याचे म्हटले आहे.

अन्य एपीआय आणि फार्म्यूलेशनमध्ये मेट्रोनिडाजोल, एसायक्लोविर, विटामिन बी1, बी6 आणि बी12, प्रोजेस्टेरोन, क्लोरॅम्फेनिकॉल, एरिथ्रोमायसिन आणि क्लिंडामायसिन साल्ट, नियोमायसिन आणि ओरनिडाजोलचा समावेश आहे.

हे निर्देश चीनकडून होणार्‍या आयातीमधील कमतरतेमुळे देण्यात आले आहेत. चीनचा हुबेई प्रांत फॉर्मा रॉ मटेरियल्स व एपीआयचा मुख्य स्रोत आहे, जे सध्या कोरोनाच्या महामारीचे प्रमुख केंद्र आहे. डीजीएफटीच्या अधिसूचनेत म्हटले आहे की, या एपीआयपासून तयार विशेष एपीआय आणि फॉर्म्यूलेशनची निर्यात पुढील आदेश येईलपर्यंत तात्काळ थांबवण्यात येत आहे.

चीनमध्ये नोवेल कोरोना व्हायरसच्या प्रकोपाचा परिणाम रॉ मटेरियलच्या आयातीवर होत आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक, ऑटो व फार्मास्यूटिकल सेक्टरच्या उत्पादनावरही परिणाम झाला आहे.