”भांडवलदारांचं संरक्षण करत मोदी सरकार ‘ईस्ट इंडिया कंपनी’सारखं वागतंय”, राष्ट्रवादीकडून ‘घणाघात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  शेतकरी कायदा आणि कामगार कायदा यांना असलेले संरक्षण मोडून केंद्रातील मोदी सरकार भांडवलदारांचे संरक्षण करुन ईस्ट इंडिया कंपनीसारखं वागत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आहे. आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते यांनी शेतकरी व कामगार विरोधी धोरण, जीएसटी आणि बिहार निवडणूक यावावरती भाष्य करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

महेश तपासे म्हणाले, भाजपने संसदेच्या पावसाळी अधिवेशनात हे सरकार सामान्यांचे नसून भांडवलदारांचे आहे हे सिद्ध करुन दाखवलं. शेतकरी कायद्यात मोठ्या घोषणा करण्यात आल्या असून, त्या वाचल्या तर स्पष्ट होत की कष्टकऱ्याला कोणत्याही रुपाने संरक्षण देण्याची त्यांची भूमिका नाही. समजा उद्या बाजार कोसळला अथवा वाढीव झाला तर त्या शेतकऱ्याला कष्टकऱ्याला त्याचा फायदा मिळणार नाही. कामगार कायद्यांतील तीन विधयेकामध्ये बदल करण्यात आला. त्यात दिसून आले की देशाचे कामगार मंत्री यांना कामगारांचे संरक्षण करण्याऐवजी देशातील भांडवलदारांचे संरक्षण केले आहे. उद्या ज्याच्या कारखान्यात ३०० कामगार आहेत त्या कामगारांना काढून कंपन्यांना तात्काळ बंद करण्याची मुभा सरकारने भांडवलदारांना दिली.

कोणताही कामगार हा ट्रेंड युनियनचा सभासद होवू नये किंबहुना कामगार चळवळींना खीळ कशी बसेल यादृष्टीने नवीन कामगार कायदा करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला. देशाची अर्थव्यवस्था वाढावी, व्यवसायास चालना मिळावी हा जरी उद्देश असला तरी कामगारांच्या हिताचे संरक्षण करणे हे केंद्र सरकारचे कर्तव्य आहे. हायर अँड फायर ही जी पाश्चिमात्य देशातील संस्कृती आपल्या देशात बसवून कामगारांना देशोधडीला लावण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे. या प्रयत्नांना संघटित व असंघटित कामगारांना हाणून पडण्याची बजावली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी कामगारांच्या व शेतकऱ्यांच्या बाजूने उभी राहणार आहे असल्याचं त्यांनी सांगितलं.

केंद्राकडून जीएसटी परतावा नाही

राज्य अडचणीत असताना कुठेही महसूल उत्पादन मिळवत नसताना हक्काचे सुमारे २२ हजार कोटी रुपये जीएसटी परतावा दिली जाईल अशी हमी देण्यात आली होती. मात्र त्यासंदर्भात केंद्रीय वित्तमंत्री किंवा पंतप्रधान यांच्या कार्यालयाकडून कोणतीच भूमिका घेतली जात नाही. अशा अडचणीच्या काळात काम करत असताना केंद्र सरकारने राज्याला भरीव अशी मदत करावी, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्र आणि पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे.

निवृत्त सनदी अधिकाऱ्यांनी किमान २ वर्षे राजकारणात येऊ नये असा नियम करावा

बिहार पोलीस दलातील डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी महाराष्ट्र राज्याची आणि पोलिसांची बदनामी केली. स्वतः २०१२ साली मुझफ्फरनगरचे अडीशनल डायरेक्टर असताना याच परिसरातील एका लहान मुलीच्या अपहरणाचा तपास लावू शकले नव्हते. हा तपास अखेर सीबीआयकडे देण्यात आला होता. पांडे हे फेल ठरलेले अधिकारी असल्याचे मत बिहारी नागरिकांचे आहे. निवडणूकीचे वारे वाहू लागतात त्यावेळी कुठलाही सनदी अधिकारी तातडीने राजीनामा देतो त्यावेळी त्याची पाऊले राजकारणाच्या दिशेने पडलेली असतात. सेवेत असताना एखाद्या पक्षाला मदत करण्याचे काम हे अधिकारी करत होते म्हणजे कर्तव्याचे पालन करत नव्हते. निवडणूक आयोगाने किमान शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या अधिकार्‍याला दोन वर्षे तरी राजकारणात येवू देवू नये, असा नियम करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like