Modi Government | मोदी सरकार BSNL आणि MTNL ची मालमत्ता विकणार; 1100 कोटी रुपयांची उभारण्याची तयारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारने (Modi Government) मालमत्ता मुद्रीकरण (Asset monetization) कार्यक्रमांतर्गत तोट्यात असलेल्या बीएसएनएल (BSNL) आणि एमटीएनएलच्या (MTNL) स्थावर मालमत्ता विकण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती दिपमने (DIPAM) दिली आहे. डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक अ‍ॅसेट मॅनेजमेंट च्या वेबसाईटवर अपलोड केलेल्या दस्ताऐवजानुसार, मोदी सरकारने (Modi Government) सर्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपन्या MTNL आणि BSNL च्या नॉन-कोर अ‍ॅसेट कमाईची यादी सुमारे 1100 कोटी रुपयांच्या राखीव किंमतीवर विक्रीसाठी सूचीबद्ध केली आहे.

बीएसएनएलच्या मालमत्ता हैदराबाद, चंदीगड, भावनगर आणि कोलकाता येथे आहेत आणि विक्रीसाठी त्यांची आरक्षित किंमत 800 कोटी रुपये आहे. तर एमटीएनएलच्या मुंबईतील गोरेगाव (Goregaon) येथील वसारी हिल येथे असलेल्या मालमत्ता सुमारे 270 कोटी रुपयांच्या राखीव किमतीत विक्रीसाठी सूचीबद्ध करण्यात आल्या आहेत. तसेच ओशिवारा (Oshiwara) येथे एमटीएनएलचे 20 प्लॉट देखील विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. याची राखीव किंमत 52.56 लाख 1.59 कोटी रुपये आहे. एमटीएनएल मालमत्तेचा ई-लिलाव 14 डिसेंबर रोजी होणार आहे. (Modi Government)

मालमत्ता मुद्रीकरण हा 69 हजार कोटींचा रिवायवल स्कीमचा (Revival scheme) भाग आहे. एमटीएनएल आणि बीएसएनएलची स्थिती सुधारण्यासाठी सरकारने ऑक्टोबर 2019 मध्ये या रिवायवल स्कीमला मंजुरी दिली होती. या योजनेनुसार दोन्ही कंपन्यांना 2022 पर्यंत 37 हजार 500 कोटी रुपयांची मालमत्ता ओळखून दोन्ही कंपन्यांना विकावी लागेल.

 

रिवायवल स्कीम काय आहे ?

BSNL आणि MTNL च्या 69 हजार कोटी रुपयांच्या रिवायवल स्कीम अंतर्गत 4-G स्पेक्ट्रम वाटप आणि मालमत्ता मुद्रीकरण यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच दोन्ही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना व्हीआरएसचा (VRS) पर्यायही देण्यात आला आहे. या दोन्ही कंपन्यांमधील 92 हजार 700 कर्मचाऱ्यांनी व्हीआरएस घेतला आहे. यामुळे दरवर्षी पगाराच्या रुपात 8800 कोटी रुपयांची बचत होणार असल्याचे मानले जाते.

 

Web Title :- Modi Government | bsnl and mtnl asset monetization worth 1100 crores details on dipam website modi government

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

EPFO ची मोठी घोषणा ! आता नोकरी बदल्यानंतर PF अकाऊंट ट्रान्सफर करण्याची गरज नाही, मध्यवर्ती सिस्टम येणार

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 75 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Mayor Murlidhar Mohol | पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ ट्विटरवर झाले ‘लखपती’ ! मोहोळ ठरले भारतातील महानगरातील सर्वाधिक ट्विटर फॉलोअर्स असणारे महापौर