खुशखबर ! मोदी सरकार देणार ५ लाख रूपयांची ‘सुट’ ; फक्‍त ‘एवढं’ काम करा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारच्या दुसऱ्या कालावधीतील पहिला अर्थसंकल्प सादर झाला आहे. या अर्थसंकल्पात अशा बऱ्याच घोषणा करण्यात आल्या ज्यांचा थेट संबंध सामान्य जनतेशी आहे. यामध्ये दोन अशा घोषणा झाल्या ज्यांच्या माध्यमातून ५ लाखापर्यंत सवलत मिळू शकते. चला जाणून घेऊ या.

अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी होम लोनच्या व्याजदरावर १.५ लाख रुपयांचा अतिरिक्त कर सवलत देण्याची घोषणा केली. आतापर्यंत आता या घोषणेनंतर होम लोनच्या व्याजदरात ३.५० लाखापर्यंत सवलत मिळेल.

पात्रतेच्या अटी
या सवलतीचा फायदा घेण्यासाठी काही अटींची पूर्तता करावी लागेल. ही सवलत ४५ लाख रुपयापर्यंतच्या होमलोनवरच मिळेल. या होमलोन चा कालावधी जास्तीत जास्त १५ वर्षे असणे अनिवार्य आहे. तसेच कर्ज घेणाऱ्याच्या नावावर कोणतीही प्रोपर्टी नसली पाहिजे. या योजनेचा फायदा १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० पर्यंत घेण्यात आलेल्या होम लोनवरच मिळेल. म्हणजेच नव्या खरेदीदारांनाच याचा फायदा घेता येईल.

इलेक्ट्रिक कारवर १.५० लाखाची सवलत
अर्थसंकल्पात घोषित करण्यात आले की इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी करण्यासाठी घेण्यात आलेल्या १.५ लाख रुपयांच्या कर्जावर कोणतेही व्याज आकारले जाणार नाही. याचबरोबर इलेक्ट्रिक वाहनांच्या पार्टवरील उत्पादन शुल्क काढून टाकण्यात आले आहे. निर्मला सीतारामन यांनी दिलेल्या माहितीनुसार १५ लाख किमतीच्या ३५,००० इलेक्ट्रिक वाहनांवर १.५० लाख रुपयांचे प्रोत्साहनात्मक अनुदान दिले जाईल.

 

आरोग्यविषयक वृत्त

रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्या पुरुषांना येऊ शकते ‘नपुंसकत्व’

‘पांढरे डाग’ घालवण्याचे घरगुती उपाय

असा दूर करा ‘विसरभोळेपणा’, जगा आनंदी आयुष्य

व्हिटॅमिन ‘डी’च्या कमतरतेमुळे लहान मुलांना होऊ शकतो ‘हाय बीपी’चा धोका

घरी तयार केलेले लोणी चवीसह देते आरोग्य !

‘या’ १३ आरोग्य समस्यांवर आहेत ‘हे’ रामबाण उपाय

पावसाळ्यात काजळाने होते इन्फेक्शन ! अशी घ्या काळजी

केसगळतीच्या समस्येवर ‘हे’ घरगुती उपाय ठरतील वरदान

दररोज ४ काजू, ८ मनुका सेवन करा, झटपट बरे होतील ‘हे’ आजार