Budget 2021 : इन्कम टॅक्स स्लॅब जरी बदलला नसला तरी बजेटसंबंधी झाल्या ‘या’ 6 मोठ्या घोषणा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज (सोमवार) अर्थसंकल्प सादर केला. नोकरदारवर्गाला या अर्थसंकल्पातून मोठी आशा होती. मात्र, आयकरच्या स्लॅबमध्ये कोणत्याही प्रकारे बदल केला गेला नाही. पण अर्थसंकल्पाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशा 6 मोठ्या घोषणा यावेळी करण्यात आल्या.

2021-22 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. यामध्ये नोकरवर्गाला मोठी आशा होती. बऱ्याच लोकांचे आयकरमध्ये सवलत मिळेल का याकडे लक्ष लागले होते. पण यामधून त्यांची निराशा झाली. आयकरच्या स्लॅबमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केला गेला नाही. पण या अर्थसंकल्पात 6 नव्या घोषणा केल्या आहेत.

वाचा 6 नव्या मोठ्या घोषणा कोणत्या…

– या अर्थसंकल्पात 75 वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना दिलासा दिला आहे. या वर्गात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक ज्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत फक्त पेन्शन आणि व्याज आहे. त्यांना ITR फाईल करण्याची गरज भासणार नाही.

– टॅक्ससंबंधी प्रकरणे पुन्हा उघडण्यासाठीचा कालावधी 6 वर्ष होता आता तो कमी करून 3 वर्षे करण्याची घोषणा केली.

– कॅपिटल गेन आणि व्याजावर मिळणारे उत्पन्न प्री-फाईल होईल. म्हणजे त्याला स्वतंत्रपणे करण्याची गरज भासणार नाही.

– केंद्र सरकारने आयकर अपीलीय न्यायाधिकरणाला फेसलेस बनविणे आणि नॅशनल इन्कम टॅक्स अपीलिएट ट्रिब्युनल सेंटर बनविण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

– डिजिटल माध्यमातून सर्वाधिक व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांना टॅक्स ऑडिटमधून मिळणारी सूट दुप्पट करण्याची घोषणा करण्यात आली.

– 50 लाख रुपयांपेक्षा जास्त मिळकत लपविण्याच्या प्रकरणांना 10 वर्षानंतर पुन्हा उघडण्याची तरतूद यामध्ये करण्यात आली आहे.