Modi Government Cabinet Expansion | मोदींच्या मंत्रिमंडळात ‘या’ दिग्गजांना मिळणार संधी? महाराष्ट्रातील 3 नावे चर्चेत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  मोदी सरकार (Modi government) दुसऱ्यांदा सत्तेत आलं आहे. दुसऱ्या पर्वाचं दुसरं वर्ष पूर्ण झालं आहे. आगामी काही दिवसामध्ये पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे. मात्र त्याआधी मोदी सरकारकडून मंत्रिमंडळाचा विस्तार (Modi Government Cabinet Expansion) केला जाणार आहे. शिवसेना, शिरोमणी अकाली दल सरकारमधून बाहेर पडलं आहे. त्यामुळे अनेक पदे रिक्त राहिली आहे. तर मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात (In the cabinet of Modi government) अनेक भाजपच्या अनेकांना स्थान मिळू शकते. अनेक दिग्गजांना संधी मिळू शकते. तर महाराष्ट्रातील (Maharashtra) देखील काही दिग्गजांना संधी मिळू शकते. तशी नावेही चर्चेत आहेत.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

केंद्रात जवळपास 80 मंत्रालयं आहेत.
तर आता साधारण 60 मंत्र्यांकडे या मंत्रालयांचा कार्यभार आहे.
तसेच, अनेक वरिष्ठ मंत्र्यांकडे अतिरिक्त पदभार देखील आहे.
मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात दोन वर्ष झाली मंत्रिमंडळाचा विस्तार (Modi Government Cabinet Expansion) झालेला नाही.
या मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातील तिघांना संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
एक म्हणजे राष्ट्रवादीला रामराम करून भाजपचा झेंडा हातात घेतलेले भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसलेंना (Udayan Raje Bhosle) केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं.
तसेच पूर्वी शिवसेनेत असणारे सध्या भाजपचे राज्यसभेचे खासदार नारायण राणेंचं (Narayan Rane) नाव देखील चर्चेत आहे.
त्याचबरोबर बीडच्या लोकसभा खासदार प्रितम मुंडे (Pritam Munde) यांचं नाव देखील मंत्रीपदी वर्णी लागण्याची चर्चा सुरु आहे. थोडक्यात त्यांच्याबद्दल जाणून घ्या.

नारायण राणे – (Narayan Rane)

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यापासून भाजप आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून जोरदार आरोपप्रत्यारोप सुरु आहे.
खा. नारायण राणे वारंवार ठाकरे सरकारवर शाब्दिक प्रहार टीकाटिपणी करीत आहेत.
तसेच, आगामी वर्षी मुंबई महापालिकेची निवडणूक रणधुमाळी होत आहे.
मुंबईची महापालिका ताब्यात घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आतापासूनच सर्व ताकद पणाला लावलीय.
नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिल्यास त्याचा फायदा भाजपला महापालिका निवडणुकीत होऊ शकतो.

Narayan Rane and Shiv Sena | शिवसेनेवर वेळावेळी टीका करणार्‍या नारायण राणेंना पीएम मोदींकडून मिळणार ‘गिफ्ट’?

उदयनराजे भोसले – (Udayan Raje Bhosle)

राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देऊन उदयनराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
म्हणून 2019 मध्ये सातारा लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पावसातील सभेमुळे ही निवडणूक गाजली.
या निवडणुकीत उदयनराजेंना हार पत्करावी लागली.
नंतर लगेच भाजपनं त्यांना राज्यसभेवर संधी दिली.

प्रीतम मुंडे – (Pritam Munde)

प्रीतम मुंडे या भाजपचे दिवंगत नेते आणि केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडें यांच्या कन्या आहेत.
गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर प्रीतम मुंडे यांनी पोटनिवडणूक लढवली.
त्या दोनवेळा लोकसभेवर निवडून आला आहेत.
मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग मराठवाड्यात आहेत.
OBC मतदारांमध्ये चांगला संदेश जाण्यासाठी प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

 

Web Title : Modi Government Cabinet Expansion | union cabinet reshuffle cards 3 bjp leaders maharashtra likely be inducted

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Mega Recruitment Health Department | आरोग्य विभागाच्या मेगा भरतीला मुहूर्त सापडला; एसईबीसी प्रवर्गातील पदे ही खुल्या अथवा ईडब्ल्यूएसतुन भरण्याचा निर्णय