modi government cabinet reshuffle | केंद्रीय मंत्रिमंडळात तब्बल 23 जणांच्या समावेशाची शक्यता !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारच्या मंत्रीमंडळामध्ये फेरबदल modi government cabinet reshuffle लवकरच होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यामध्ये फेरबदलही करण्यात येणार आहे. दुसऱ्या कार्यकाळातील दोन वर्षांतील मंत्रालयाच्या कामकाजाचा लेखाजोखा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला असून २० कॅबिनेट मंत्री (Cabinet Minister) व स्वतंत्र प्रभार असलेल्या मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावाही घेण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे केलेली ही प्रक्रिया म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये फेरबदलाची modi government cabinet reshuffle नांदी समजली जात आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

या बैठकीस संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Defense Minister Rajnath Singh), गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah), महामार्ग वाहतूक, परिवहन मंत्री नितीन गडकरी (Transport Minister Nitin Gadkari) आणि अन्य मंत्री उपस्थित होते. काही कारणांमुळे विदेशी मंत्री एस जयशंकर (Minister S. Jaishankar), शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक (Education Minister Ramesh Pokhriyal Nishank) यांना उपस्थित राहता आले नाही. २०१६ मध्येही अशाच प्रकारे विविध मंत्रालयाच्या कामगिरीचा आढावा घेतल्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार करण्यात आला होता. पंतप्रधानांसह ५५ मंत्री सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात आहेत. त्यामुळे आणखी २३ मंत्र्यांचा समावेश करून विस्तार केला जाऊ शकतो.

कॅबिनेट, राज्यमंत्री आणि स्वतंत्र प्रभार असलेल्या मंत्र्यांना पदे देताना कामे पूर्ण करण्याची लेखी रूपरेखा दिली होती. त्यामुळे कामगिरीचा आढावा हा मंत्रिमंडळातील स्थान टिकवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. भाजपचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा (J. P. Nadda) यांना काही महत्त्वाच्या विभागाच्या कामगिरीचा आढावा घेण्यास निमंत्रित करण्यात आले होते.

 

कोणाला काय मिळू शकते?

मंत्रिमंडळात सामील होण्याची इच्छा नसली तरी वायएसआर काँग्रेसला लोकसभेचे उपाध्यक्ष पद दिले जाऊ शकते. तर जनता दल युनायटेडला दोन कॅबिनेट मंत्रीपदे दिली जातील. त्याशिवाय पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र, उत्तर प्रदेशला अधिक प्रतिनिधित्व दिले जाईल. केंद्रीय मंत्रिमंडळात तीन कॅबिनेट मंत्र्यांसह उत्तर प्रदेशचे ८ मंत्री आहेत.

चिराग यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी
पाटना : लोक जनशक्ती पार्टीत फूट पडली आहे.
आता राजकीय घडामोडीना वेग आला असून चिराग पासवान यांनी पाच खासदारांना पक्षातून निलंबित केले आहे.
या गटाने आम्ही चिराग पासवान यांना राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून हटविले असून त्यांच्या जागी सूरजभान सिंह यांची निवड करण्यात आली आहे.
लवकर कार्यकारिणीच्या बैठकीत नव्या अध्यक्षांची निवड होणार आहे.

Wab Title :- modi government cabinet reshuffle | indications major changes union cabinet possibility inclusion 23 leaders

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Karnala Bank Scam | कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना ED कडून अटक

Nashik – Pune railway line | पुणे रेल्वे मार्गातील शेतकऱ्यांना 5 पट मोबदला, पालकमंत्र्यांनी दिले आश्वासन

Anti-Corruption Bureau | 40 हजाराची लाच घेणारा सरपंच ACB जाळ्यात; आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा

योगी सरकारचा मोठा निर्णय ! ज्येष्ठाला मारहाण व दाढी कापण्याच्या प्रकरणाला वेगळं वळण; ट्विटरसह 9 जणांवर FIR, धार्मिक भावना भडकावल्याचा आरोप

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा