Modi Government | मोदी सरकार देतय 60 वर्षानंतर 5000 रुपये दरमहा ‘पेन्शन’, पती-पत्नी दोघे मिळवू शकतात 10,000 महिना; जाणून घ्या कसे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Modi Government | मोदी सरकारच्या (Modi Government) या योजनेने खासगी नोकरी करणारे, शेतकरी, दुकानदार, विक्रेते, फेरीवाले यांना वृद्धत्वासाठी खास आधार दिला आहे. या योजनेत सहभागी होणार्‍यांना वयाच्या 60 वर्षानंतर 5000 रुपये महिना पेन्शन मिळेल. जर पती-पत्नी दोघांनी या योजनेचा लाभ घेतला असेल त्यांना 60 वर्षानंतर 10,000 रुपये महिना पेन्शन मिळेल.

जर पती किंवा पत्नी पैकी एकाचा मृत्यू झाला तर ही पेन्शन पती किंवा पत्नी (नॉमिनी) पैकी जो जिवित असेल त्यास मिळू लागेल.
सरकारच्या योजनेचे नाव अटल पेन्शन योजना (Atal pension yojana) आहे.

या योजनेत सहभागी होण्यासाठी आपल्या मासिक कमाईतील एक छोटा भाग Atal pension yojana मध्ये गुंतवावा लागेल.
जर योजनेचा लाभ घेणार्‍या व्यक्तीचे वय 18 वर्ष आहे तर त्यास 210 रुपये महिना गुंतवणूक करावी लागेल. पतीचे वय 24 वर्ष आणि पत्नीचे वय 21 वर्ष आहे.

तर पतीला योजनेत दर महिना 346 रुपये आणि पत्नीला दरमहिना 269 रुपये जमा करावे लागतील.
हे पैसे 59 वर्षापर्यंत जमा करावे लागतील. 60व्या वर्षापासून पती-पत्नी दोघांना 10,000 रुपये महिना म्हणजे 1 लाख 20 हजार रुपये वार्षिक पेन्शन आयुष्यभर मिळू लागेल.

सरकारच्या अटल पेन्शन योजनेत (Atal Pension Yojana- APY) पैसे लावू शकता.
अटल पेन्शन योजना 2015 मध्ये असंघटित क्षेत्रात काम करणार्‍या लोकांसाठी सुरू करण्यात आली होती.

योजनेचा लाभ घेण्यासाठी नियम आणि अटी :

योजनेत सहभागी होण्यासाठी किमान वय 18 वर्ष आणि कमाल 40 वर्ष असावे.
यामध्ये वयाच्या हिशेबाने मंथली प्रीमियम ठरलेला असतो.
सर्वात कमी प्रीमियम 18 वर्षाच्या वयात योजनेचा लाभ घेतल्यास द्यावा लागतो.
सर्वात जास्त प्रीमियम 30 वर्षाच्यानंतर द्यावा लागतो.
कारण पेन्शनची किमान रक्कम 1000 मासिक आणि कमाल 5000 मासिक ठरवलेली आहे.
प्रीमियम देताना पेन्शनच्या रक्कमेला आधार बनवले जाते.

 

जर पेन्शन धारकाचा मृत्यू झाला तर

अटल योजनेच्या पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यानंतर रक्कम काढण्यासाठी किंवा पेन्शन योजना सुरू ठेवण्यासाठी जी बँक किंवा टपाल कार्यालयात खाते आहे तिथे संपर्क साधा.
सोबतच पॉलिसी धारकाचे मुळ मृत्यू प्रमाणपत्र, नॉमिनीचे केवायसी, नॉमिनीच्या बँक खात्याची माहिती, नॉमिनीचे खातेधारकाशी असलेल्या संबंधाचा पुरावा घेऊन जा.
येथे बँक शाखा तुमच्याकडून आवश्य माहिती मागेल आणि व्हेरिफेकेशननंतर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

जर 60 वर्षापूर्वी धारकाचा मृत्यू झाला तर…

पेन्शनचा लाभ घेणार्‍याचा मृत्यू 60 वर्षाच्या अगोदर झाला तर त्या स्थितीत सुद्धा पेन्शन त्याच्या नॉमिनीला दिली जाईल.
कोणत्याही बँकेत किंवा पोस्टात खाते उघडून याचा लाभ घेता येऊ शकतो.

 

Web Title : Modi Government | central government giving 5000 rupees month pension after 60 years both husband and wife can get 10000 months know how

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Saral Pension | फायद्याची गोष्ट ! LIC ने आणलाय 40 च्या वयात पेन्शन देणारा जबरदस्त प्लान, जाणून घ्या अटी

Nagpur News | आरटीओ खरमाटेची ईडीकडून चौकशी ! पुण्यात छापे

Pune Police | व.पो.नि. डांगे यांची नगरला बदली, कोथरूडच्या वरिष्ठ निरीक्षकपदी गुन्हे शाखेतील ‘या’ अधिकाऱ्याची नियुक्ती