Modi Government | मोदी सरकारने लाँच केले ‘पीएम दक्ष पोर्टल’ ! रोजगाराला चालना देण्यासाठी दिले जाईल ‘कौशल्य’ प्रशिक्षण, जाणून घ्या कुणाला मिळणार लाभ

नवी दिल्ली : Modi Government | केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री वीरेंद्र कुमार (Union Minister Virendra Kumar) यांनी ‘पीएम-दक्ष पोर्टल (PM Daksha Portal) आणि अ‍ॅप (App) ची सुरुवात केली. हे अ‍ॅप मागासवर्ग, अनुसूचित जाती आणि स्वच्छता कर्मचार्‍यांसाठी कौशल्य विकास योजना सुलभ करण्यासाठी सुरू केले आहे. सामाजिक न्याय मंत्रालयाकडून 2020-21 पासून पीएम-दक्ष योजना लागू केली (Modi Government) जात आहे.

या योजनेंतर्गत पात्र लोकांना सर्व प्रशिक्षण दिले जाईल. सरकारी ट्रेनिंग इन्स्टीट्यूट हे प्रशिक्षण देतील, ज्यांची निवड मंत्रालय करेल किंवा इतर विश्वसनिय संस्था करतील.

आता कोणतीही व्यक्ती ‘पीएम-दक्ष’ पोर्टल (PM Daksha Portal) वर जाऊन कौशल्य विकास प्रशिक्षण (Skill development training) मधून संबंधित सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळवू शकतो. याशिवाय केवळ एका क्लिकसह, आपल्या आजूबाजूला होत असलेल्या कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांबाबत माहिती प्राप्त करू शकतो आणि तो सहजपणे योग्य ट्रेनिंगसाठी स्वताला रजिस्टर्ड करू शकतो.

कुमार यांनी म्हटले या पोर्टलच्या काही प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये अनुसूचित जाती, मागास वर्ग आणि
सफाई कर्मचार्‍यांसाठी कौशल विकासासंबंधी सर्व माहिती उपलब्ध, ट्रेनिंग संस्थासोबत
रजिस्ट्रेशनची सुविधा आणि महत्वाच्या कार्यक्रमांसाठी सुविधांचा समावेश आहे.

व्यक्तीगत माहितीशी संबंधीत एैच्छिक कागदपत्र अपलोड करण्याची सुविधा, ट्रेनिंग कालावधी
दरम्यान चेहरा आणि डोळ्यांच्या स्कॅनिंगच्या माध्यमातून आपली उपस्थिती नोंदवणे आणि
प्रशिक्षणातील फोटो आणि व्हिडिओ क्लिकच्या माध्यमातून देखरेखीची सुविधा यांचा समावेश आहे.
यावेळी मंत्र्यांनी डिजिटल बेस्ट प्रॅक्टिसेस आणि नॉर्थ ईस्ट समिट या राष्ट्रीय संमेलनाचे अध्यक्षस्थान
भूषवले.

हे देखील वाचा

Pune Crime | व्यवसायात गुंतवलेले 30 लाख परत मागितल्याने मित्राच्या गळ्यावर वार करुन खुनाचा प्रयत्न; हडपसरमधील घटना

Vaccine Certificate | WhatsApp द्वारे डाऊनलोड करा COVID-19 व्हॅक्सीन सर्टिफिकेट, जाणून घ्या एकदम सोपी पध्दत

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Modi Government | central government launched pm daksha portal skill training will be given to promote employment know who will get benefits

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update