Modi Government | सरकारी कर्मचार्‍यांना 2,18,200 रुपये देईल मोदी सरकार, ऑक्टोबरमध्ये अकाऊंटमध्ये येऊ शकतात पैसे, जाणून घ्या

नवी दिल्ली : Modi Government | मोदी सरकार (Modi Government) दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचार्‍यांना पुन्हा एकदा भेट देऊ शकते. भारत सरकार केंद्रीय कर्मचार्‍यांचा (central government employees) महागाई भत्ता 3 टक्के वाढवून 31 टक्के करू शकते. यापूर्वी सरकारने जुलैमध्ये महागाई भत्ता 17 टक्केवरून वाढवून 28 टक्के आणि हाऊस रेंट अलाउन्स 24 टक्केवरून वाढवून 27 टक्के केला होता. आता पुन्हा केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता वाढू शकतो. यापूर्वी केंद्र सरकारने कोरोना महामारीमुळे जानेवारी 2020 पासून केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता रोखला होता, जो जून 2021 मध्ये जारी केला.

डीए एरियरची मागणी करत आहेत कर्मचारी

महागाई भत्ता वाढीनंतर केंद्रीय कर्मचारी डीए एरियरची मागणी करत आहेत. सरकारने जुलै 2021 पासून महागाई भत्ता 28 टक्के केला आहे, परंतु जुलै 2021 पर्यंत सर्व कर्मचार्‍यांना 17 टक्केच्या दरानेच महागाई भत्ता मिळेल. हा महागाई भत्ता जानेवारी 2020 पासून रोखला होता.

कर्मचार्‍यांचे होतेय मोठे नुकसान

सरकारने महागाई भत्ता रोखल्याने तो दर सहा महिन्यात 3 टक्केच्या दराने पुढे देखील सरकला नव्हता. यामुळे कर्मचारी मागणी करत होते की, त्यांचा थकित महागाई भत्ता 28 टक्के केला पाहिजे. असे न झाल्याने कर्मचार्‍यांचे मोठे नुकसान होत आहे.

Gold Price Today | आजही सोन्याच्या दरात घसरण; जाणुन घ्या आजचे दर

बैठक झाली पण निर्णय गुलदस्त्यात

नॅशनल कौन्सिल ऑफ जेसीएम, डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेंनिग अँड अर्थ मंत्रालयाने कर्मचार्‍यांच्या मागणीबाबत 26-27 जूनरोजी बैठकसुद्धा घेतली होती, परंतु यावर कोणता निर्णय झाला याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तीन विभागापैकी कोणत्याही अधिकार्‍याने याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही.

इतके पैसे मिळण्याची आशा

17 टक्केच्या दराने दिला जात असलेला महागाई भत्ता कोरोना महामारीमुळे सुमारे दिड वर्ष रोखला होता. जाणकारांनुसार, या कालावधीसाठी लेव्हल-1 च्या कर्मचार्‍यांचा डीए एरियर 11,880 रुपये ते 37,554 रुपयांच्या दरम्यान असेल. तर, लेव्हल-14 (पे-स्केल) च्या कर्मचार्‍यांना डीएचे 1,44,200 रुपये ते 2,18,200 रुपये मिळू शकतात.

RBI | PMC आणि गुरु राघवेंद्र सहकारी बॅंकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर ! नोव्हेंबरपर्यंत मिळणार पैसे , RBI देणार 10 हजार कोटी

काय आहे DA चा फायदा

डीएला महागाई भत्ता म्हणून ओळखले जाते. सर्व सरकारी कर्मचार्‍यांना याचा लाभ मिळतो.
सरकार दर 6 महिन्याला ठरवते की महागाई किती वाढली आहे आणि महागाईपासून वाचवण्यासाठी सरकारी कर्मचार्‍यांना महागाई भत्ता दिला जातो.

सातव्या वेतन आयोगानुसार (7th pay commission) दर 6 महिन्यात महागाई भत्ता किमान 3 टक्केपर्यंत वाढतो.
मागील वर्षाच्या तुलनेत एकुण महागाई भत्ता 11 टक्केपर्यंत वाढला आहे. जुलै 2021 पासून केंद्रीय कर्मचार्‍यांना 28 टक्केच्या दराने महागाई भत्ता मिळत आहे.

राज्यांनी सुद्धा वाढवला महागाई भत्ता

केंद्र सरकारने जून 2021 मध्ये भत्ता 3 टक्के वाढवला आहे आणि आता तो 31 टक्केवर पोहचणार आहे.
याचा अर्थ आहे की, ज्या कर्मचार्‍यांची बेसिक सॅलरी 50,000 रुपये असेल त्यास 15,500 रुपये डीए मिळेल.

केंद्रानंतर राज्यांनी सुद्धा डीए वाढवण्याचा निर्णय घेतला आहे आणि उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर, झारखंड, हरियाणा, कर्नाटक, राजस्थान आणि आसाम सारख्या राज्यांनी सरकारी कर्मचार्‍यांचा डीए वाढवला आहे. डीए कर्मचार्‍यांच्या बेसिक सॅलरी ठराविक भाग असतो.

हे देखील वाचा

Palghar Anti Corruption | 70 हजाराचे लाच प्रकरण ! रात्री 11 वाजता ACB चा ‘सापळा’; कारवाईत भाजीपाला विक्रेता आणि पोलीस कर्मचारी ‘जाळ्यात’, जाणून घ्या प्रकरण

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! पत्नी आणि सासुच्या त्रासामुळे तरुणाची आत्महत्या, मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्ड करुन संपवलं ‘जीवन’

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Modi Government | central government will give rs 218200 to government employees money can come in the account in october know details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update