Modi Government | बोगस मतदान रोखण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय ! मतदान ओळखपत्र आधारशी लिंक करावं लागणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Modi Government | भारतीय नागरीकांचे आधार कार्ड (Aadhaar Card) एक महत्वाचे कागदपत्र आहे. त्यामुळे खासगी आणि सरकारी कामामध्ये आधार कार्ड शिवाय कोणतेही काम पुर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे आधार एक नागरीकांची ओळख आहे. दरम्यान, नुकतेच पॅनकार्डसोबत आधार लिंक करणे (PAN-Aadhar Link) आधीच आवश्यक होते. यानंतर आता मतदान ओळखपत्र (Voting ID Card) आधारशी लिंक करावं लागणार आहे. याबाबत मोदी सरकारने (Modi Government) निर्णय घेतला आहे.

 

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे एका व्यक्तीकडे फक्त एकच मतदार ओळखपत्र असेल आणि ज्यांनी एकापेक्षा जास्त मतदार ओळखपत्रे ठेवली आहेत त्यांची ओळख पटवल्यास बोगस ओळखपत्र दूर होण्यास मदत होईल, या निर्णयसंदर्भात सरकारकडून अधिसुचना जारी करण्यात आली आहे. याबाबत माहिती केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू (Union Law Minister Kiren Rijiju) यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. (Modi Government)

कायदा मंत्र्यांनी एक तक्ता शेअर केला आहे ज्यामध्ये असे लिहिले आहे की मतदार यादीचा डेटा आधार इकोसिस्टमशी जोडल्यानंतर, एकच व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणी एकापेक्षा अधिक मतदार ओळखपत्रे वापरू शकणार नाही. निवडणूक प्रक्रिया सुधारण्यासाठी मोदी सरकारने उचललेले हे ऐतिहासिक पाऊल असल्याचे कायदामंत्र्यांकडून सांगण्यात आलं आहे.

 

या दरम्यान, 1 एप्रिल 2022 पासून पॅनला आधारशी लिंक करण्यासाठी 30 जून पासून तुम्हाला दुप्पट दंड भरावा लागणार आहे.
1 एप्रिल 2022 पासून आधारला पॅन क्रमांकाशी जोडण्यासाठी 500 रुपये दंड भरावा लागतो.
मात्र, जर तुम्ही 30 जून 2022 पर्यंत लिंक केले नाही तर तुम्हाला 1 जुलैपासून 1 हजार रुपये दंड भरावा लागेल.

 

Web Title :- modi government | central modi government issue order for voter id to be linked with aadhar card

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा