मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Modi Government | महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी (Coronavirus) लाट आली आहे. त्याचबरोबर काल (गुरूवारी) देशाचे पंतप्रधान यांनी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. त्यावेळी राज्यात कोरोना लशीचा साठा पुरेसा असल्याचे सांगण्यात आलेय. मात्र, महाराष्ट्रात लशीचा (Corona vaccine) तुटवडा असल्याचं सांगणाऱ्या बातम्या काही प्रसार माध्यमांमधून प्रसिद्ध केल्या आहे. तसेच, लशींच्या तुटवड्यामुळे राज्याला लसीकरणाची (Vaccination) गती वाढवणे शक्य होत नसल्याचेही या बातमीत म्हटलं आहे. अशा प्रकारच्या बातम्या पूर्णपणे खोटे आणि अपुऱ्या माहितीवर आधारित असल्याचं केंद्र सरकारने (Modi Government) स्पष्ट केलं आहे.
केंद्राने (Modi Government) म्हटले की, आज (14 जानेवारी 2022) उपलब्ध झालेल्या अहवालानुसार महाराष्ट्राकडे कोवॅक्सिन या लशीच्या न वापरलेल्या 24 लाखांपेक्षा अधिक मात्रा आहेत. तसेच आज लसीच्या 6.35 लाख अतिरिक्त मात्रा प्राप्त झाल्यात. कोविनवर उपलब्ध असलेल्या त्यांच्या साप्ताहिक वापराच्या आकडेवारीनुसार, 15 ते 17 वयोगटातील लाभार्थींना देण्यासाठी आणि खबरदारीची मात्रा देण्यासाठी महाराष्ट्राचा दैनंदिन सरासरी वापर 2.94 लाख मात्रा आहे. त्यामुळे राज्याकडे पात्र लाभार्थींना कोवॅक्सिन या लसीच्या मात्रा देण्यासाठी पुढील 10 दिवस पुरेल इतका साठा उपलब्ध आहे. तसेच राज्याकडे कोविडशील्ड या लशीच्या वापर न झालेल्या आणि शिल्लक असलेल्या सुमारे 1.24 कोटी मात्रा आहेत. त्यांचा दिवसाला सरासरी 3.57 लाख मात्रांचा वापर विचारात घेतला तर हा साठा लाभार्थींना लसी देण्यासाठी 30 दिवसापेक्षा जास्त दिवस पुरेसा ठरू शकतो. त्यामुळेच प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त वस्तुस्थितीला धरून नाही आणि महाराष्ट्रात शिल्लक असलेल्या साठ्याचे आणि वापर न झालेल्या कोरोना लसींच्या मात्रांचे वास्तविक चित्र प्रदर्शित करत नाही.
राजेश टोपे काय म्हणाले?
राजेश टोपे (Rajesh Tope) म्हणाले की, ”कोरोना प्रतिबंधक लस कायदेशीर बंधनकारक
करण्यासंदर्भातील 100 टक्के लसीकरण करण्याच्या दृष्टीने घर घर दस्तक आणि मिशन कवच कुंडलच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे पण,
काही लोक अद्यापही लशीच्या विरोधात आहेत.
गाव पातळीवर आशा वर्कर्स अशा लोकांची यादी तयार करत असून लसीकरण बंधनकारक नसून ऐच्छिक असल्याचं हा परिणाम आहे.
शंभर टक्के लसीकरण करायचं असेल तर लशीला विरोध करणाऱ्या लोकांसाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार लस बंधनकारक करता येईल का,
अशी लेखी विचारणा केंद्राकडे केल्याची माहिती त्यांनी दिली आहे.”
Web Title :- Modi Government | corona vaccine stocks in the Maharashtra are not low the news is false explained by center government
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Uttar Pradesh Election 2022 | भाजपचे 2 मंत्री, 6 आमदार, माजी आमदार ‘समाजवादी पार्टी’त