…तर भारतात WhatsApp बंद होणार का ?, मोदी सरकार बनवतय स्वतःचं ‘अ‍ॅप’, ‘जाणून घ्या’ कसं करणार काम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात सोशल मॅसेजिंगसाठी व्हाट्सअ‍ॅप आणि टेलिग्राम सारखी खूप सारी अ‍ॅप वापरली जातात. परंतु यात वापरकर्त्यांचा डेटा किती सुरक्षित आहे हा मोठा प्रश्न आहे. या समस्येतून बाहेर पडण्यासाठी भारत सरकार लवकरच एक मोठं पाऊल उचलणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, भारत सरकार अधिकृत संप्रेषणाची गोपनीयता सुधारण्यासाठी स्वतःचे सोशल मेसेजिंग अ‍ॅप सुरू करणार आहे. यासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने चाचणी सुरू केली आहे. प्राप्त माहितीनुसार, या मोबाइल अ‍ॅपला गव्हर्नमेंट इन्स्टंट मेसेजिंग सर्व्हिस (जिम्स) असे नाव देण्यात येणार आहे.

अ‍ॅपची होत आहे चाचणी
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या ‘जिम्स’ हे अ‍ॅप सर्वसामान्यांसाठी नाही, तर केवळ सरकारी संस्थाच त्याचा वापर करू शकणार आहेत. असेही म्हटले जात आहे की केंद्र सरकारची कार्यालये आणि विभागांव्यतिरिक्त ‘जिम्स’ चा वापर राज्य सरकार देखील करू शकतील. प्राप्त माहितीनुसार, ‘जिम्स’ हे राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (एनआयसी) द्वारे विकसित केलेले एकत्रीत मेसेजिंग अ‍ॅप असेल.

प्रथम भारतीय नौदल वापर करणार
या अ‍ॅपची सध्या ओडिशामध्ये चाचणी घेण्यात येत आहे आणि प्रथम या अ‍ॅपचा वापर भारतीय नौदलात केला जाणार आहे. भारत सरकार सुरक्षेसाठी हे अ‍ॅप विकसित करीत आहे. हे केरळच्या राष्ट्रीय माहिती केंद्राने डिझाइन केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, जिम्स अ‍ॅपची बीटा व्हर्जन आली आहे आणि देशातील १७ सरकारी एजन्सी त्याची चाचणी घेत आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप वापरणं होईल बंद
परराष्ट्र मंत्रालय, गृह मंत्रालय, नौदल, रेल्वे आणि सीबीआय सारख्या अनेक सरकारी संस्थांमध्ये ही बीटा चाचणी चालू आहे. सध्या ६ हजाराहून अधिक वापरकर्ते जिम्सची बीटा आवृत्ती वापरत आहेत. हे अ‍ॅप यशस्वी ठरल्यास ते औपचारिकपणे सरकारी कार्यालये आणि कर्मचार्‍यांसाठी वापरले जाणार आहे. अशा परिस्थितीत सरकारी संस्थांमध्ये व्हॉट्सअ‍ॅपचा वापर थांबविला जाऊ शकतो.

फेसबुक पेज लाईक करा –