Modi Government | खुशखबर ! मोदी सरकार घरबसल्या देत आहे 2 लाख रुपये; केवळ 30 जूनपूर्वी करावे लागेल ‘हे’ काम

नवी दिल्ली : केंद्र सरकार (Modi Government) लोकांना विशेषता तरूणांना 2 लाख रुपये जिंकण्याची संधी देत आहे. ही बक्षीसाची रक्कम जिंकण्यासाठी तुम्हाला एका स्पर्धेत भाग घ्यावा लागेल. सरकारने लोकांना तंबाखू (Tobacco) च्या दुष्परिणामाबाबत जागरूकता करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले आहे. सरकार अशाप्रकारच्या स्पर्धांचे नेहमीच आयोजन करत असते.

जाणून घ्या कसे जिंकाल 2 लाख रुपये

सरकारने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. स्पर्धेचे मुख्य बक्षीस 2 लाख रुपयांचे आहे. याबाबत सर्वकाही जाणून घेवूयात…

1. शॉर्ट फिल्म बनवावी लागेल

शॉर्ट फिल्म बनवण्याची तुम्हाला आवड असेल तर जागतिक तंबाखू निषेध दिन 2021 (World No-Tobacco Day 2021) निमित्त तंबाखूच्या दुष्परिणामावर ती बनवू शकता. ही शॉर्ट फिल्म किमान 30 सेकंद आणि जास्तीत जास्त 60 सेकंदाची असावी.

हे लोक घेऊ शकतात भाग

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे कर्मचारी आणि त्यांचे नातेवाई सोडून या स्पर्धेत 18 वर्षापेक्षा जास्त वयाचे सर्व नागरिक/भारतीय नागरिक (31 मे, 2003 किंवा त्यापूर्वी जन्म झालेले) भाग घेऊ शकतात.

अशी आहे बक्षीसाची रक्कम
1st Prize : 2,00,000/-
2nd Prize : 1,50,000/-
3rd Prize : 1,00,000/-
प्रोत्साहनपर पुरस्कार : 10 लोकांना 10,000 प्रत्येकी दिले जातील.

या लिंकवर करा क्लिक
* अधिक माहितीसाठी https://www.mygov.in/task/short-film-making-contest वर जा.
* महत्वाच्या तारखा
– सुरूवातीची तारीख : 31 मे, 2021
– जमा करण्याची अंतिम तारीख : 30 जून, 2021.

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | महाराष्ट्रातील कोरोना मृत्यूच्या आकड्यांची लपवाछपवी?, देवेंद्र फडणवीस म्हणाले…

 

Jio Vs BSNL | 90 दिवसांची व्हॅलिडिटी आणि Jio पेक्षा 2.4 पट डेटा, कमालीचा आहे हा BSNL प्लॅन


ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Modi Government | creating short films on world no tobacco day and govt give 2 lakhs rupees check details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update