Modi Government | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! आता सुट्टीदरम्यान झालेल्या हल्ल्यात जवानांचा मृत्यू झाल्यास ऑन ड्यूटी मानले जाईल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Modi Government | रजेवर असताना सैनिकांवर हल्ला होण्याबाबत मोदी सरकारच्या (Modi Government) संरक्षण मंत्रालयाने एक स्पष्टीकरण जारी केले आहे. जर रजेवर गेलेल्या एखाद्या सैनिकावर दहशतवादी (terrorist attack) किंवा समजाकंटकांनी हल्ला केल्यास आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू (Dead) झाला तर अशा प्रकरणाला कर्तव्यावर असताना झालेला मृत्यू मानले (On Duty) जाईल. त्यानुसारच नुकसान भरपाई प्रदान केली जाईल. तिनही सैन्य दलांना हा आदेश लागू आहे.

अलिकडेच जारी केलेल्या मोदी सरकारच्या (Modi Government) आदेशात म्हटले आहे की, यामध्ये अजूनपर्यंत अनेक मुद्द्यांवर स्थिती स्पष्ट नव्हती. जर कुणी सैनिक रजेवर आपल्या घरी आला आहे किंवा इतर कुठे गेला असेल, आणि या दरम्यान दशहतवादी किंवा समाजकंटकांनी त्यास हल्ला करून मारले तर त्यास कर्तव्यावर तैनात मानले जाईल. त्याचे कुटुंबिय त्याच प्रकारे भरपाईला पात्र असतील जी ड्यूटी करताना मृत्यू झाल्यास दिली जाते.

आदेशात म्हटले आहे की, सुट्टीचा अर्थ त्या सर्व सुट्ट्यांशी आहे ज्या सरकारकडून सैन्य कर्मचार्‍यांना प्रदान केल्या जातात.
मागील काही काळापासून सैन्य कर्मचार्‍यांवरील हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. विशेष करून ते जेव्हा रजेवर होते.
मात्र, अशा घटना काश्मीरमध्ये जास्त घडल्या आहेत. परंतु सरकारकडून या बाबतीत स्पष्टीकरण जारी करून सैन्य कर्मचार्‍यांना दिलासा देण्यात आला आहे.

 

मंत्रालयाने सांगितले हे मत

मंत्रालयाने म्हटले की, जर सैन्य कर्मचार्‍यावर रजेदरम्यान दशहतवादी किंवा समाजकंटांनी हल्ला केला
तर त्याचे कारण हेच असू शकते की तो सैन्य कर्मचारी असल्यानेच त्याच्यावर हल्ला करण्यात आला.
ज्यामध्ये त्याचा जीव गेला. यासाठी त्यास या लाभाचा अधिकार आहे. मात्र, वैयक्तिक शत्रूत्व किंवा पूर्ववैमनस्यातून मृत्यू झाल्यास लाभ मिळणार नाही.

Web Title :- Modi Government | death of a soldier on leave in another attack should be considered on duty ministry of defense

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | ‘राष्ट्रवादीच्या मंत्र्याने NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली’, अजित पवार म्हणाले…

Ratan Tata-Rakesh Jhunjhunwala | रतन टाटांच्या ‘या’ 2 कंपन्यांनी राकेश झुनझुनवाला यांना करून दिली सर्वात जास्त कमाई, जाणून घ्या यावर्षी किती दिला रिटर्न

Ajit Pawar Warning | … मात्र, बॉलिवूड मुंबईतच राहिल ! अजित पवारांचा युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ‘कडक’ इशारा (व्हिडीओ)

Pune News | पुण्यात अजित पवारांच्या उपस्थितीत ‘बालगंधर्व’ रंगमंदिरात वाजली तिसरी घंटा; कितीवेळा वाजवायची कोणाला माहिती… (व्हिडीओ)