खुशखबर ! आता दर 6 महिन्यात वाढणार ‘सॅलरी’, 3 कोटी लोकांना होणार ‘फायदा’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रत्येक नोकरदार वर्षभर या विचारात असतो की आपला पगार कधी वाढणार. परंतु जर वर्षांतून दोनदा पगार वाढणार असे तुम्हाला सांगितले तर तुम्ही काय म्हणाल. म्हणजे दर 6 महिन्यांनी पगार वाढणार. इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हे एखाद्या गिफ्ट पेक्षा कमी नसेल.

केंद्र सरकार महागाईचा सामना करण्यासाठी एक नियोजन करत आहे, ज्याअंतर्गत कर्मचाऱ्यांवरील महागाईचा बोझा कमी करण्यासाठी नव्या महागाई सूचकांकानुसार पगारात वाढ केली जाईल.

नियमानुसार इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये काम करणाऱ्या तब्बल 3 कोटी कर्मचाऱ्यांचा पगार दर 6 महिन्याने वाढेल. ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारावर महागाईचा कमी परिणाम होईल.

बिजनेस स्टॅंडर्डच्या अहवालानुसार सरकारच्या एका उच्च स्तरीय समितीने इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी उपभोक्ता मूल्य सूचकांकासंबंधित एक नवा आधार निश्चित केला आहे, याद्वारे महगाई भत्ता महागाई सूचकांना जोडला जाईल.

मागील महिन्यात 27 तारखेला मुख्य श्रम आणि रोजगार सल्लागार बी एन नंदा यांच्या नेतृत्वात एक महत्वाची बैठक झाली होती, ज्यात इंटस्ट्रियल सेक्टरच्या कर्मचाऱ्यांसाठी नव्या सीरीजचे उपभोक्ता मूल्य सूचकांकाला मंजूरी दिली गेली होती. यासाठी 2016 ला आधार वर्ष मानले गेले होते.

एका अंदाजानुसार मोदी सरकारच्या या निर्णयाने देशातील संघटीत क्षेत्रातील इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये 3 कोटी कर्मचाऱ्यांना फायदा होईल. केंद्र सरकार आणि खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्याचे मूल्यांकन 6 महिन्याला होईल. हे काम करण्यासाठी सीपीआय – आयडब्ल्यूचा आधार घेतला जाईल.

परंतु 2001 नंतर सीपीआय – आयडब्ल्यूमध्ये संशोधन केलेले नाही, तर यात दर 5 वर्षानंतर बदल होण्याची आवश्यकता आहे. 7 व्या वेतन आयोगावेळी देखील सीपीआय – आयडब्ल्यू आकड्यांचा आधार घेतला गेला होता.

सीपीआयच्या जुना आधार सध्याच्या गणनेनुसार नाही, कारण मागील दोन दशकात उपभोक्ता प्रारुपात बदल झाले आहेत. महागाईच्या गणनेत काही विशेष वस्तू आणि सेवांवर देखील लक्ष ठेवले जाईल.