राममंदिर बांधण्यात सरकारचीच दिरंगाई ; ‘या’ नेत्याचा भाजपला घरचा आहेर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या भाजप नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी राम मंदिराच्या संवेदनशील मुद्द्यावरून भाजप वर टीका करत घरचा आहेर दिला आहे. अयोध्या दौऱ्यावरून नुकत्याच परतलेल्या उद्धव ठाकरेंची स्वामी यांनी आज भेट घेतली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी स्वामी यांनी राममंदिराबाबत मोदींना कोणीतरी चुकीचा सल्ला दिला असून राममंदिर बांधण्यास सरकारच उशीर करत असल्याचे परखड विधान केले. यावेळी त्यांनी राम मंदिराच्या निर्मानाबाबत चर्चा झाल्याचे स्पष्ट केले.

अयोध्या दौऱ्यावरून परतलेल्या उद्धव ठाकरेंची स्वामी यांनी मातोश्री वे घेतलेली आजची भेट राममंदिराच्या मुद्द्यांवर महत्वाची होती. सुब्रमण्यम स्वामी म्हणाले कि जमिनींचे राष्ट्रीयीकरण झालेले असल्याने सरकारकडे या जमिनीचा मालकी हक्क आहे. त्यामुळे मंदिर बांधणीसाठी सरकारला कोणाच्याही परवानगीची आवश्यकता नाही. असे असताना सरकारला वाटेल तेव्हा बांधणीचे काम सुरु करू शकते.

स्वामी यांनी पुढे सांगितले कि ज्या लोकांच्या जमिनी सरकार घेणार आहे त्यांना सरकारने मोबदला दिल्याची कागदपत्रे न्यायालयात सादर केल्यानंतर सर्व कामकाजाची पूर्तता होईल. त्यानंतर मंदिर बांधणीच्या कामास कोणत्याही क्षणी सुरुवात करता येईल. आज उद्धव ठाकरे यांच्याशी माझी यासंदर्भात महत्वपूर्ण चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कामास प्राधान्य देत नसून यासंदर्भात मी त्यांना पत्र देखील लिहिले आहे. असे असताना सरकार या कामात उगीचच दिरंगाई करत असल्याचे सांगत स्वामी यांनी भाजपला घरचा आहेर दिला.

आरोग्य विषयक वृत्त-
#YogyaDay 2019 : ‘सौंदर्य’ आणि ‘तारुण्य’ वाढविणारे नटराजन आसन
“ऍसिडिटीने” त्रस्त असणाऱ्यांसाठी रामबाण उपाय
” टाच ” दुखीमुळे त्रस्त असाल तर, जाणून घ्या टाच दुखीची कारणे आणि उपाय

You might also like