तरुण मिळवू शकणार सहज ‘नोकऱ्या’, सरकार देणार अत्याधुनिक ‘प्रशिक्षण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारी किंवा खासगी नोकरी मिळवणे आता जिकरीचे काम झाले आहे. मात्र मोदी सरकार यावर उपाय म्हणून पंतप्रधान मोदींच्या महत्वाकांक्षी योजना स्किल इंडियामध्ये काही महत्वपुर्ण बदल आणण्याच्या तयारीत आहे. यासाठी नवे नियोजन करण्यात येणार आहे. आता यात मोठ्या कंपन्यांबरोबरच असंघटीत आणि छोट्या संस्थांनांवर देखील लक्ष देण्यात येणार आहे.

सरकार देणार प्रशिक्षण

यात काय काय बदल होणार हे सांगताना कौशल्य विभागाच्या सेक्रेटरी डॉ. के.पी. कृष्णन यांनी सांगितले की स्किल इंडिया मिशन मध्ये बदल करण्यात येणार आहे. यात असंघटित क्षेत्रांवर फोकस करण्यात येणार आहे. सरकारने ४ ते ६ हजार लोकांना रोजगार देणाऱ्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये हॉटेल, रेस्टोरंट, छोटे व्यवसाय यांचा समावेश होतो.

डॉ. के.पी. कृष्णन यांनी सांगितले की फ्रान्सच्या दसॉं बरोबर एअरोनॉटिक्सचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सुरुवातीला दसॉकडून टेक्निशियन प्रशिक्षण देण्यात येईल. यातून कौशल्य विकास करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे. यातून एअर फिटर, वेल्डर आणि कटरचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

रोजगाराचा प्रश्न देशात गंभीर झाला आहे, विरोधक सत्ताधारी भाजपवर यामुळे टीका करत आहे. त्यामुळे मोदी सरकार तरुणांना रोजगार मिळवून देण्याच्या प्रयत्नात आहे, यासाठीच स्किल इंडिया योजनेअंतर्गत विविध श्रेणीतील तरुणांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जेणे करुन तरुणांना त्यांच्या कौशल्याच्या आधारे नोकऱ्या मिळू शकतील. यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे.

आरोग्यविषयक वृत्त

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी

चॉकलेट वॅक्सचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या

पोटाची चरबी कमी न होण्याची ‘ही’ ९ मोठी कारणे, त्यासाठी ‘हे’ करा

वजन कमी करण्यासाठी ‘हे’ खाऊ नका

मासिक पाळीच्या दरम्यान विचार पूर्वक निवडा वापरण्यात येणारी साधने

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी