Modi Government | आठवड्यात 5 ऐवजी 4 दिवसच करावी लागेल नोकरी, 3 दिवस मिळेल सुट्टी ! मोदी सरकार आणू शकतं नवीन नियम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Modi Government कर्मचार्‍यांना आता आठवड्यात पाच दिवसांच्या ठिकाणी 4 दिवस नोकरी करावी लागेल आणि दोन दिवसाऐवजी आठवड्यात 3 दिवस सुट्टी असेल. देशात बनवलेल्या नवीन कामगार कायद्यानुसार (Labour Codes) येत्या काही दिवसात आठवड्यात तीन दिवस सुट्टी मिळू शकते. Modi Government | employees will have to work four days in a week and three days leave modi government new rules in labor code business

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

इकडे केंद्र सरकारने ट्रॅव्हलिंग अलाऊंन्स म्हणजे टीए (Travel Allowance) क्लेम सबमिशनचा कालावधी 60 दिवसांवरून वाढवून 180 दिवस केला आहे.
तो 15 जून 2021 पासून लागू करण्यात आला आहे.
मार्च 2018 मध्ये केंद्र सरकारने रिटायर्मेंटवर टीए क्लेमचा कालावधी 1 वर्षाने कमी करून 60 दिवसाचा केला होता.
ही कालमर्यादा वाढवण्यासाठी सरकारला (Modi Government ) अनेक सरकारी विभाग सांगत होते, ज्यांनतर हा निर्णय घेण्यात आला.

5 ऐवजी 4 दिवस करावी लागेल नोकरी

नवीन लेबर कोडमध्ये नियमांमध्ये हा पर्याय सुद्धा ठेवला जाईल की, ज्यावर कंपनी आणि कर्मचारी आपसातील सहमतीने निर्णय घेऊ शकतात.
नवीन नियमांतर्गत सरकार कामाचे तास वाढवून 12 करणार आहे.
काम करण्याच्या तासांची आठवड्यात कमाल मर्यादा 48 तास ठेवली गेली आहे, अशावेळी कामाचे दिवस कमी होऊ शकतात.

कामाचे तास 12 करण्याचा प्रस्ताव

नवीन ड्राफ्ट कायद्यात कामकाजाचे कमाल तास वाढवून 12 करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.
कोडच्या ड्राफ्ट नियमांत 15 ते 30 मिनिटांच्या दरम्यानच्या अतिरिक्त कामकाजाला सुद्धा 30 मिनिटे मोजून ओव्हरटाइममध्ये समावेशक करण्याची तरतूद आहे.

सध्या नियमात 30 मिनिटापेक्षा कमी वेळ ओव्हरटाइम (Overtime) योग्य मानली जात नाही.
ड्राफ्ट नियमात कोणत्याही कर्मचार्‍याकडून सलग 5 तासापेक्षा जास्त काम करून घेण्यास मनाई आहे.
म्हणजे 12 तासाच्या एकुण कामात प्रत्येक पाच तासानंतर अर्धातास विश्रांती द्यावी लागेल.

पगार कमी होणार, पीएफ वाढणार

नवीन ड्राफ्ट रूलनुसार, मुळे वेतन एकुण वेतनाच्या 50% किंवा जास्त असावे.
यामुळे बहुतांश कर्मचार्‍यांच्या वेतनाच्या स्ट्रक्चरमध्ये बदल होईल.
टेक होम सॅलरी कमी होईल आणि पीएफची अमाऊंट वाढू शकते.
नवीन वेतन कोड लागू झाल्यानंतर कंपनीला सीटीसीच्या 50 टक्के मूळ वेतनाच्या (बेसिक सॅलरी) रूपात कर्मचार्‍याला द्वावे लागेल.

असे होईल पगाराचे स्ट्रक्चर

पीएफ आणि ग्रॅच्युटी सारख्या इतर घटकांसाठी कर्मचार्‍यांचे योगदान वाढेल.
न्यू वेज कोड लागू झाल्यावर बोनस, पेन्शन, वाहन भत्ता, घरभाडे भत्ता, निवास लाभ, ओव्हरटाइम इत्यादी बाहेर होईल.
कंपन्यांना हे ठरवावे लागेल की, बेसिक सॅलरी सोडून सीटीसीमध्ये समावेश केलेले काही इतर घटक 50 टक्केपेक्षा जास्त होऊ नयेत आणि उर्वरित अर्ध्यात बेसिक सॅलरी असावी.

 

Web Title : Modi Government | employees will have to work four days in a week and three days leave modi government new rules in labor code business

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

PM Narendra Modi | लोकप्रियतेत पीएम नरेंद्र मोदीच सर्वोत्कृष्ट नेते; जो बायडन यांच्यासह 13 जागतिक नेत्यांना टाकलं मागे