Modi Government | खुशखबर ! नोकरी करणार्‍यांना मोफत मिळेल 7 लाखांची ‘ही’ सुविधा, जाणून घ्या कसा घ्यायचा लाभ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Modi Government | केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) कोरोना काळात (Coronavirus Pandemic) नोकरदार लोकांसाठी (Employee’s) मोठा दिलासा दिल्याचा दावा केला आहे. एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड इन्श्युरन्स स्कीम, 1976 (EDLI Scheme) अंतर्गत देण्यात येणार्‍या विमा रक्कमेची मर्यादा आता 6 लाखावरून वाढून 7 लाख रुपये करण्यात आली आहे. म्हणजे आता तुम्हाला फ्रीमध्ये 7 लाख रुपयांपर्यंतचा लाभ मिळू शकतो. ईपीएफओ (EPFO) कडून आपल्या सबस्क्रायबर्सला जीवन विम्याची सुविधा दिली जाते.

EPFO चे सर्व सबस्क्रायबर इम्प्लॉईज डिपॉझिट लिंक्ड इन्श्युरन्स स्कीम 1976 (EDLI) च्या अंतर्गत कव्हर होतात. अलिकडेच इन्श्युरन्स कव्हरची कमाल रक्कम 7 लाख रुपये झाली आहे, जी अगादेर 6 लाख रुपये होती. कामगार मंत्री संतोष गंगवार यांच्या अध्यक्षतेखाली ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज (सीबीटी) ने 9 सप्टेंबर 2020 ला EDLI योजनेंतर्गत कमाल विमा रक्कम वाढवून 7 लाख रुपये करण्याचा निर्णय घेतला होता.

 

वाढलेले हे लिमिट लागू

कामगावर मंत्रालयाने 28 एप्रिलला EDLI योजनेंतर्गत कमाल विमा रक्कम वाढवून 7 लाख रुपये करण्याचा निर्णय लागू करण्यासाठी अधिसूचना जारी केली. अधिसूचनेच्या तारखेपासून हे वाढलेले लिमिट लागू झाले आहे.

 

कधी घेऊ शकता या स्कीमचा फायदा?

या रक्कमेसाठी क्लेम नॉमिनीकडून पीएफ खातेधारकाचा आजाराने, दुर्घटनेत किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर केला जाऊ शकतो. यामध्ये एकरक्कमी पैसे दिले जातात. हा इन्श्युरन्स कव्हर सबस्क्रायबरला फ्री मिळतो. यासाठी त्यांना कोणतीही रक्कम द्यावी लागत नाहीत. पीएफ अकाऊंटसोबत ते लिंक होते.

यासाठी इन्श्युरन्स कंपनीला डेथ सर्टिफिकेट, सक्सेशन सर्टिफिकेट आणि बँक डिटेल्स देण्याची आवश्यकता असते. कोविड-19ने होणार्‍या मृत्यूच्या प्रकरणात सुद्धा हा घेता येऊ शकतो. जर कुणाचा कुणी नॉमिनी नसेल तर कायदेशीर वारस क्लेम करू शकतो. पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी एम्प्लॉयरकडे जमा होणार्‍या फॉर्मसोबत इन्श्युरन्स कव्हरचा फॉर्म-5 आयएफ सुद्धा जमा करा. या फॉर्मची एम्प्लॉयर पडताळणी करतो. यानंतर कव्हरचे पैसे मिळतात.

 

कंपनी भरते प्रीमियम

सध्या ईपीएफमध्ये कर्मचार्‍याच्या बेसिक सॅलरीच्या 12 टक्के रक्कम जमा होते.
एम्प्लॉयर सुद्धा 12 टक्के जमा करतो परंतु ती दोन भागात जमा होते.
कंपनी 3.67 टक्के रक्कम ईपीएफमध्ये आणि 8.33 टक्के रक्कम ईपीएसमध्ये जमा करते.
या स्कीममध्ये कर्मचार्‍याला कोणत्याही प्रकारचे योगदान द्यावे लागत नाही.

 

कसे होते कॅलक्युलेशन?

EDLI स्कीममध्ये क्लेमची गणना कर्मचार्‍या मिळालेल्या शेवटच्या 12 महिन्याची बेसिक सॅलरी+DA च्या आधारावर केली जाते.
सध्या या इन्श्युरन्स कव्हरचा क्लेम अखेरची बेसिक सॅलरी+DA च्या 35 पट होईल.
सोबतच आता 1.75 लाख रुपयांचा कमाल बोन असेल. हा बोनस शेवटच्या 12 महिन्या दरम्यान एव्हरेज पीएफ बॅलन्सच्या 50 टक्के मानला जातो.
उदाहरणार्थ 12 महिन्याची बेसिक सॅलरी+DA जर 15000 रुपये असेल तर इन्श्युरन्स क्लेम (35 x 15,000) + 1,75,000= 7 लाख रुपये होतो.

Web Title : Modi Governement | epfo edli scheme now you can get 7 lakh rupees benefits of this scheme check how

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

State Bank Of India | SBI ने ग्राहकांना केलं अलर्ट; पॅन कार्ड आधारशी लिंक न केल्यास बँकिंग सेवेवर होणार परिणाम

India Post Payments Bank | इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या ‘या’ नियमात आजपासून होणार बदल; डोअरस्टेप बँकिंगसाठी मोजवे लागणार 20 रुपये

MPSC ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निर्देशानंतर 2 दिवसात शासनाकडून निर्णय

Atul Bhatkhalkar | अतुल भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांना टोला; म्हणाले – ‘…त्यासाठी घराची कडी काढावी लागते’