Modi Government | मोदी सरकारकडून सर्वसामान्यांना दिवाळी भेट ! इंधनावरील टॅक्स घटवला, पेट्रोल 5 रूपयांनी तर डिझेल 10 रूपयांनी ‘स्वस्त’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था दिवसेंदिवस देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर (petrol and diesel price) वाढत होते. गेल्या अनेक महिन्यांपासून इंधनाच्या दरामध्ये कमालीची वाढ होत होती. मात्र, आता केंद्रातील मोदी सरकारनं (Modi Government) पेट्रोल आणि डिझेलवरील करात कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला ( excise duty cut on petrol diesel) आहे. मोदी सरकारकडून (Modi Government) सर्वसामान्यांना दिवाळीची भेट देण्यात आली आहे असचं म्हणावं लागेल. करात कपात करण्यात येणार असल्यामुळे पेट्रोलमध्ये 5 रूपये तर डिझेलमध्ये 10 रूपयांची घट होणार असल्याचं संकेत मिळत आहेत. एकंदरीत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होणार असल्यानं सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

देशात काल (मंगळवार) विविध राज्यात पोटनिवडणुका झाल्या. त्यामध्ये भाजपला चांगलाच फटका बसला आहे.
त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
दरम्यान, पुण्यात पेट्रोल 115.52 रूपयांनी मिळत होते ते आता साधारण 110 रूपये प्रति लिटरनं मिळेल असं आपल्याला म्हणता येईल.
डिझेल 104.67 रूपयांवरून 94 रूपयांच्या आसपास मिळेल.
पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर हे आज (बुधवार) मध्यरात्री म्हणजेच दि. 3 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत. याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेनं ट्विट केलं आहे.
इंधनाचे तसेच गॅस सिलेंडरचे दर सातत्यानं वाढत असल्यानं राज्यात सत्ताधारी आणि केंद्रात विरोधी असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने भाजप सरकारविरूध्द रान उठवलं होतं.
ठिकठिकाणी इंधन आणि गॅस दर वाढीमुळं आंदोलने केली जात होती.
अखेर केंद्रातील भाजप सरकारनं (Modi Government) इंधनावरील करामध्ये कपात केली असल्यामुळं पेट्रोल साधारण 5 तर डिझेल साधारण 10 रूपयांनी स्वस्त होणार आहे.
त्याचा निश्चितच फायदा सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे.

 

Web Title : Modi Government | excise duty cut on petrol diesel Modi govt offers relief to common man: Fuel tax reduced, petrol reduced by Rs 5 and diesel by Rs 10

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | पोलिस कर्मचार्‍याकडून शारीरिक व मानसिक त्रास ! WhatsApp व्दारे सुसाईट नोट पाठवून महिला पोलिसाची आत्महत्या, प्रचंड खळबळ

Multibagger Stock | 58 रुपयाचा शेयर 345 रु.चा झाला, केवळ 11 महिन्यात गुंतवणुकदार झाले मालामाल, तुमच्याकडे आहे का?

Nawab Malik | ‘भंगारवाला असल्याचा मला अभिमान’, असे छातीठोकपणे म्हणणाऱ्या नवाब मलिकांची संपत्ती किती? जाणून घ्या