मोदी सरकारची मोठी घोषणा ! ESLGS योजनेचा विस्तार, आता कमी व्याजदरानं मिळणार 2 कोटीपर्यंतचं कर्ज, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे झालेले आर्थिक नुकसान पाहता अर्थ मंत्रालयाने रविवारी मोठी घोषणा केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपत्कालीन क्रेडिट लाईन गॅरंटीयोजनेचा विस्तार केला आहे. ईसीएलजीएस ESLGS 4.0 च्या अंतर्गत, हॉस्पिटल, नर्सिंग होम, क्लिनिक, मेडिकल कॉलेजांना ऑन साईट ऑक्सीजन उत्पादन संयंत्र स्थापन करण्यासाठी दिलेल्या 2 कोटीपयंतच्या कर्जावर 100% गॅरंटी कव्हर दिले जाईल. यावर 7.5 टक्के व्याजदर ठरवला आहे.

कानातील संसर्गाकडे दुर्लक्ष नका करू, ‘हे’ घरगुती उपाय देवू शकतात दिलासा

याशिवाय सरकारने ईएसएलजीएस ESLGS 1.0 योजनेचा कालावधी सुद्धा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा कालावधी वाढवून 30 सप्टेंबर 2021 पर्यंत किवा जोपर्यंत 3 लाख कोटीचे कर्जवाटप होत नाही तोपर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गत 31 डिसेंबर 2021 पर्यंत लोन डिस्बर्समेंट करावे लागेल. मंत्रालयाद्वारे एका वक्तव्यानुसार, ज्या लोकांनी ’ईसीएलजीएस 1.0’ च्या अंतर्गत कर्ज घेतले आहे, त्यांना चार वर्षाऐवजी आता कर्ज फेडण्यासाठी पाच वर्षाचा वेळ मिळेल. म्हणजेच आता त्यांना 24 महिन्याचे व्याज द्यावे लागेल आणि मुळे रक्कम आणि व्याज एकुण 36 महिन्यात भरावे लागेल.

जाणून घ्या काय आहे ईसीएलजीएस
इमर्जन्सी के्रडिट लाईन गॅरंटी स्कीम (ईसीएलजीएस) ची सुरूवात अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी कोरोना व्हायरस महामारी आणि लॉकडाऊनमुळे व्यापार्‍यांवर आलेले संकट कमी करण्यासाठी मे 2020 मे मध्ये केली होती. या योजनेचा उद्देश सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, व्यावसायिक उद्योग, तसेच मुद्रा योजनेच्या कर्जदारांना पूर्णपणे गॅरंटी आणि गॅरंटी फ्री लोन प्रदान करणे आहे.

Also Read This : 

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन, बॉम्बशोधक पथक दाखल; तपास सुरु

लैंगिक संबंध ठेवल्यानंतर कशी आणि किती दिवसात गर्भधारणा होते ? जाणून घ्या

ब्लॅक, व्हाईट फंगसनंतर भारतात अ‍ॅस्परगिलोसिसची प्रकरणे आली समोर; जाणून घ्या लक्षणं, कारणे आणि बचावाचे उपाय

शिवसेनेचे पदाधिकारी एकनाथ पाटील यांचे स्पष्टीकरण, म्हणाले – ‘… तो Video 2 वर्षांपूर्वीचा, भाजपाने घरगुती वादाचा गैरफायदा घेऊ नये’