‘सुपर’हिट होतोय ‘हा’ व्यवसाय, तुम्ही देखील दरमहा कमवा दीड लाख, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुमच्याकडे शेती असेल तर तुम्ही नवीन व्यवसायाच्या माध्यमातून पैसे कमवू शकता. गुजरात सरकारने या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कमाईमध्ये 10 पटीने वाढ केली असून राज्यसरकारच्या या योजनेमुळे शेतकरी आपल्या मुलांना उच्चशिक्षित करण्यास देखील सक्षम होत आहेत. शेतकरी गुलाबाची आणि झेंडूच्या फुलांची शेती करून चांगली कमाई करत आहेत.

सणासुदीच्या दिवसात चारपट नफा
येथील एका अहवालात सांगण्यात आले आहे कि, या फुलांची शेतीची करणाऱ्या शेतकऱ्यांची कमाई हि 1 लाख ते दीड लाख रुपये झाली असून आधी हि कमाई फार कमी होती. गेसुबेन परमार हे मागील सहा वर्षांपासून या गुलाबाची शेती करत असून महिन्याला ते 20 ते 30 हजार गुलाब तोडतात. त्याचे त्यांना एका गुलाबाचे सामान्यपणे 10 रुपये मिळतात. मात्र सणासुदीच्या काळात हाच दर 20 ते 40 रुपये असतो.

मुलांना शिकवण्यास सक्षम
गुलाब आणि झेंडूच्या फुलांच्या विक्रीतून शेतकऱ्यांना अतिशय उत्तम उत्पन्न मिळत असून यामुळे शेतकरी आपल्या मुलांना देखील शाळेत पाठवू शकतात. लहान मुलांना सर्व शेतकरी शाळेत पाठवत असून या शेतीमुळे काहींना स्वतःची शेती घेणे देखील शक्य झाले आहे.

गुजरात सरकारमुळे फायदा
येथील अनेक कामगार हे फुलांची शेती करत आहेत. कम्बोई येथील 300 घरांपैकी जवळपास 100 घरांमध्ये हि फुलांची शेती केली जाते. सरकारकडून या शेतीसाठी सबसिडी देखील दिली जात असून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देखील दिले जात आहे.

Visit : Policenama.com