‘या’ लाभदायक स्कीममधून शेतकरी करू शकतात लाखोंची कमाई ! 80 % पैसे देणार मोदी सरकार, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : मोदी सरकारने शेतकर्‍यांसाठी आणखी एक नवीन योजना सुरू केली आहे. ज्याअंतर्गत ‘फार्म मशीनरी बँक’ (Farm Machinery Bank) उघडून चांगले उत्पन्न मिळू शकते. या योजनेचे नाव ‘सीएचसी फार्म मशीनरी’ असे आहे. हे एक अ‍ॅप आहे, ज्यावर आपल्या शेतीसाठी लागणारी यंत्रसामग्री (साधने) अगदी स्वस्त दराने ऑर्डर केली जाऊ शकतात. जर आपल्याला शेतीविषयक यंत्रणा संबंधित व्यवसाय करायचा असेल तर आपण त्यातून दरवर्षी लाखो पैसे कमवू शकता. खास गोष्ट म्हणजे फार्म मशिनरी बँकसाठी सरकार अनुदानासह इतरही अनेक प्रकारची मदत करत आहे.

80 टक्के पर्यंत शासकीय मदत

यासाठी 80% पर्यंत सरकारी निधी मिळेल. मोदी सरकारच्या या योजनेचे नाव कस्टम हायरिंग सेंटर आहे. देशातील छोट्या शेतकर्‍यांना आधुनिक शेती साधने भाड्याने उपलब्ध होण्यासाठी केंद्र सरकार देशभरात ‘कस्टम हायरिंग सेंटर’ निर्माण करण्यास प्रोत्साहित करीत आहे. आणि 50 हजाराहून अधिक ‘कस्टम हायरिंग सेंटर’ देखील बांधले गेले आहेत. आपण याला कृषी यंत्रणा बँक म्हणू शकतो. शेतकर्‍याला अनेक पर्याय मिळतील ज्यामध्ये तो कोणत्याही सेंटरमधून त्याला परवडेल त्या भाड्याने मशीन खरेदी करू शकेल.

या योजनेबद्दल जाणून घेऊया

हे अ‍ॅप अगदी ओला, उबरप्रमाणे आहे. यंत्रसामग्रीचा दर सरकार निश्चित करणार नाही. ही सुविधा पाच ते 50 किलोमीटर दरम्यान उपलब्ध असेल. मंत्रालयातील यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञान विभागाचे अतिरिक्त आयुक्त व्ही.एन. काळे यांनी सांगितले की सरकार यंत्रणेचे भाडे निश्चित करीत नाही. जर बाजारात स्पर्धा असेल तर शेतकऱ्याला स्वस्त आणि चांगली सेवा मिळेल. जर आपल्याकडे एकही कृषी यंत्र असेल तर आपण त्यास भाड्याने देण्यासाठी अ‍ॅपमध्ये नोंदणी करू शकता.

सरकार किती आणि कशी मदत करेल?

आपण जर खाजगी कस्टम हायरिंग सेंटर (सीएचसी) तयार करत असाल तर सरकार 40 टक्के रक्कम देईल. यात 60 लाख रुपयांपर्यंतचा प्रकल्प पास होऊ शकेल. म्हणजेच त्यांच्या भागातील शेतकऱ्यांच्या गरजेनुसार ते इतक्या प्रमाणात मशीन खरेदी करू शकतात. या प्रकल्पात 24 लाख रुपयांची शासकीय मदत उपलब्ध होईल. आपण सहकारी गट स्थापन करून मशीन बँक तयार केल्यास गटात 6 ते 8 शेतकरी असावेत. यामध्ये दहा लाखांपर्यंतचा प्रोजेक्ट पास होईल. म्हणजेच तुम्हाला 8 लाख रुपयांपर्यंत सरकारी मदत मिळेल. अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधव आपापल्या राज्यांच्या कृषी विभागाच्या अभियांत्रिकी विभागात संपर्क साधू शकतात.

खर्च आणि जोखीम कमी करण्याचा प्रयत्न

काळानुसार शेतीत आधुनिकिकरण वाढत आहे, नवनवीन मशीन्सची गरज भासत आहे. मग ते तण किंवा फवारणी यंत्र असो की मग लावणीचे किंवा काढणीचे यंत्र असो. प्रत्येकासाठी महागडे यंत्रे खरेदी करणे सोपे नाही. अशा परिस्थितीत मोदी सरकार स्वतः अ‍ॅग्रीगेटर बनले आहे.

कृषी मंत्रालयाने कस्टम हायरिंग सेंटर तयार करण्यासाठी आणि त्यांचा लाभ घेण्यासाठी अ‍ॅप सुरू केले आहे. हे अ‍ॅप 12 भाषांमध्ये उपलब्ध आहे. आतापर्यंत हे अ‍ॅप 50 हजार लोकांनी डाउनलोड केले आहे. या योजनेशी संबंधित अधिकाऱ्यांना आशा आहे की जेव्हा एखाद्या मशीनला खरेदी करण्याऐवजी ते भाड्याने मिळेल तेव्हा खर्च कमी होईल, त्यांचे उत्पन्न वाढेल आणि कर्जाची कोणतीही समस्या उद्भवणार नाही. दुसरीकडे, जो शेतकरी याचा व्यवसाय करीत आहे त्याला सरकार आर्थिक पाठबळ देत आहे.

अर्ज कसा करावा

फार्म मशिनरी बँकसाठी शेतकर्‍यांना अनुदानासाठी त्यांच्या भागातील ई-मित्र कियॉस्कवर एक निश्चित फी देऊन अर्ज करावा लागेल. अनुदानासाठी अर्जासोबत फोटो, मशीनरी बिलाच्या छायाचित्राची प्रत, भामाशाह कार्ड, आधार कार्ड, बँक खाते पास बुकच्या छायाचित्राच्या प्रतिसहित आणखी काही कागदपत्रे सादर करावी लागतात.