Modi Government | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! आणखी चार महिने 5 किलो मोफत रेशन

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Modi Government | केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना म्हणजेच PMGKAY (Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana) मार्च 2022 पर्यंत वाढवण्यास मंजुरी दिली आहे. आता या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मार्च 2022 पर्यंत मोफत रेशन मिळणार आहे. या निर्णयामुळे भारतातील शिधापत्रिकाधारकांना एक मोठा दिलासा आहे.

 

केंद्राने घेतलेल्या या निर्णयामुळे पुणे जिल्ह्याच्या (Pune District) ग्रामीण भागातील एकूण 27 लाख 11 हजार 159 तर पुणे-पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरातील एकूण 12 लाख 69 हजार शिधापत्रिकाधारकांना याचा लाभ मिळणार आहे. यामध्ये प्रतिव्यक्तीला 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ मोफत दिले जाणार आहे. यातील तांदूळ आणि गहू चांगल्या दर्जाचा मिळाला आहे,’ अशी माहिती पुणे शहर अन्न-धान्य वितरण अधिकारी सचिन ढोले (Sachin Dhole) यांनी सांगितले आहे. (Modi Government)

पुढे सचिन ढोले (Sachin Dhole) म्हणाले, ‘भारतीय अन्न महामंडळाकडून चांगले सहकार्य मिळत आहे. या महिन्यातही रेशनवरील गहू आणि तांदूळ चांगल्या दर्जाचे मिळाले आहेत. पुणे शहरासाठी जवळपास 12,600 मेट्रिक टन इतका तांदूळ आणि गहू चालू महिन्यात मिळाला आहे. नोव्हेंबर महिन्यातील जवळपास 94.5 टक्के वाटप केले आहे. तर, पुणे, पिंपरी शहरात काही अपंग, आजारी नागरिक आहेत. त्याचबरोबर काहींना विविध कारणास्तव धान्य घेता येत नाही अथवा प्रत्यक्ष स्वस्त धान्य दुकानांपर्यंत येणे शक्य होत नाही. अशा सर्व नागरिकांना घरपोच धान्य पुरवण्याची व्यवस्था केली आहे.

 

Web Title :- Modi Government | free grain will be available another four months PMGKAY Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana Modi Government

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune School Reopen | 15 डिसेंबरपासून पुण्यात शाळा सुरु होणार? वर्षा गायकवाड यांनी दिले ‘हे’ संकेत

Devendra Fadnavis | ‘देशासमोरील सर्व प्रश्नांची उत्तरं संविधानामध्ये मिळतात’

Pune Crime | पुण्यात भरदिवसा पोलिस चौकीपासून हकेच्या अंतरावर तरूणावर बेछुट गोळीबार ! भारती विद्यापीठ परिसरातील घटना, प्रचंड खळबळ

Pune Crime | खंडणी न दिल्याने हातगाडी चालकाचे घरातून अपहरण अन् केली बेदम मारहाण; विश्रांतवाडी परिसरातील घटना

Pune Crime | पुण्यात डिलीव्हरी बॉयनं पार्सल घेणार्‍या 23 वर्षीय तरूणीला पाहून थेट केलं ‘हस्तमैथुन’, कोंढवा-उंड्रीतील घटना

Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगाराचा वारजे पोलीस चौकीत आत्महत्येचा प्रयत्न; दारू पिऊन केला ‘राडा’, प्रचंड खळबळ

Modi Government | ‘मायचं दूध प्यायला असाल तर माझा भ्रष्टाचार काढून दाखवा’, मोदी सरकारमधील महाराष्ट्रातील मंत्र्याचं खुलं ‘चॅलेंज’