Modi Government | मोदी सरकारची मोठी घोषणा ! आयुष्मान भारत अंतर्गत मुलांना 5 लाखापर्यंतचा फ्री आरोग्य विमा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकार (Modi government) ने कोरोनाने प्रभावित मुलांसाठी (children affected by corona) फ्री हेल्थ इन्श्युरन्स (free health insurance) ची घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर (Union Minister Anurag Thakur) यांनी याची माहिती ट्विट करून दिली आहे. या माहितीनुसार ज्या मुलांनी आपले आई-वडील किंवा पालकांना कोरोनामुळे गमावले आहे त्यांना आयुष्मान भारत योजनेंतर्गत (Ayushman Bharat Yojana) 5 लाख (Rs 5 lakh) रुपयांपर्यंतचा मोफत विमा सरकारकडून (Modi Government) उपलब्ध करून दिला जाईल. या विम्याचा प्रीमियम पीएम केयर (PM Care) मधून भरला जाईल.

या मुलांच्या आरोग्याची देखभाल लक्षात घेऊन सरकारने या योजनेची घोषणा केली आहे, ज्याअंतर्गत मुलांना 18 वर्षाच्या वयापर्यंत मोफत उपचार मिळेल. मुलांना 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा दिला जात आहे. तर मुले जेव्हा 23 वर्षांची होतील तेव्हा त्यांना 10 लाख रुपयांचा फंड दिला जाईल. सरकार किशोर न्याय (मुलांची देखभाल आणि संरक्षण कायदा) अंतर्गत मुलांना हे संरक्षण प्रदान करत आहे. याबाबत pmcaresforhildren.in वर सविस्तर माहिती घेता येईल.

देशातील अनेक राज्यांनी कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांची सुरक्षा आणि त्यांच्या देखभालीसाठी अनेक घोषणा आणि योजना लागू केल्या आहेत. हरियाणा सरकारने अशा मुलांना दरमहिना 2500 रुपये देण्याची योजना सुरू केली आहे. तर यूनिसेफच्या मदतीने उत्तर प्रदेश सरकारने अशा मुलांसाठी हॅलो मुस्कानची सुरुवात केली आहे.

Web Title :- Modi Government | free health insurance of rs 5 lakhs under ayushman bharat for children affected by covid19

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Coronavirus | अलर्ट ! मुलांना कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका? जाणून घ्या कशाप्रकारे करावा त्यांचा व्हायरसपासून बचाव

Pune Lockdown | पुणेकरांना दिलासा मिळणार?; पुणे पालिकेनं राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, राजेश टोपे, सचिव कुंटे यांच्यात बैठक

Sangli Crime | ओढणीने गळफास घेऊन डॉक्टरची आत्महत्या, सांगलीतील धक्कादायक घटना