Modi Government | 1 ऑक्टोबरपासून कार्यालयाची वेळ होईल 12 तासांची, ‘OT’ चे मिळणार पैसे आणि वाढणार PF, जाणून घ्या नवीन बदल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Modi Government | नोकरदार लोकांसाठी पुढील महिन्यात ऑक्टोबरपासून मोठा बदल होणार आहे. मोदी सरकार (Modi Government) एक ऑक्टोबरपासून कामगार कायद्याच्या नियमात (New Wage Code) बदल करणार आहे. जर हे नियम लागू झाले तर एक ऑक्टोबरपासून तुमचा ऑफिस टाइम वाढेल. नवीन कामगार कायद्यात 12 तासांचे काम करण्याबाबत म्हटले आहे. याशिवाय इन हँड सॅलरीसुद्धा कमी होणार आहे. नवीन लेबर कोडचे तुमच्यावर कोणते परिणाम होणार आहेत ते जाणून घेवूयात…

1 ऑक्टोबरपासून बदलतील सॅलरीशी संबंधीत महत्वाचे नियम

आता लेबर मिनिस्ट्री आणि मोदी सरकार लेबर कोडचे नियम 1 ऑक्टोबरपर्यंत नोटिफाय करणार आहे. संसदने ऑगस्ट 2019 ला तीन लेबर कोड इंडस्ट्रियल रिलेशन, कामाची सुरक्षा, हेल्थ अँड वर्किंग कंडीशन आणि सोशल सिक्युरिटीशी संबंधीत नियमांमध्ये बदल केले होते.
हे नियम सप्टेंबर 2020 ला पास झाले होते.

12 तासांची होऊ शकते नोकरी

नवीन कायद्यात कामकाजाचे कमाल तास वाढवून 12 तासांचे काम करण्याबाबत म्हटले आहे.
कोडच्या नियमांत 15 ते 30 मिनिटांच्या दरम्यानच्या अतिरिक्त कामकाजाला सुद्धा 30 मिनिटे मोजून ओव्हरटाइममध्ये समावेश करण्याची तरतूद आहे.
सध्या नियमात 30 मिनिटापेक्षा कमी वेळ ओव्हरटाइम योग्य मानली जात नाही.
नवीन नियमात कोणत्याही कर्मचार्‍याकडून सलग 5 तासापेक्षा जास्त काम करून घेण्यास मनाई आहे.
म्हणजे 12 तासाच्या एकुण कामात प्रत्येक पाच तासानंतर अर्धातास विश्रांती द्यावी लागेल.

 

पगार कमी होणार आणि PF वाढणार

नवीन ड्राफ्ट रूलनुसार, मुळ वेतन एकुण वेगतानाच्या 50% किंवा निम्मे असावे.
यामुळे बहुतांश कर्मचार्‍यांच्या वेतनाचे स्ट्रक्चर बदलून जाईल.
बेसिक सॅलरी वाढल्याने पीएफ आणि ग्रॅच्युएटीसाठी कापले जाणारे पैसे वाढतील.
कारण यामध्ये जाणारे पैसे बेसिक सॅलरीच्या प्रमाणात असतात.
जर असे झाले तर घरात येणारा पगार कमी होईल आणि निवृत्तीनंतर मिळणारा पीएफ आणि ग्रॅच्युएटी वाढेल.

 

Web Title : Modi Government | from october 1 office time will be for 12 hours pf will increase check details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Alert ! 30 सप्टेंबर नंतर तुम्ही करू शकणार नाही कोणतेही ट्रांजक्शन, अडकतील सर्व पैसे, जाणून घ्या काय आहे कारण?

Modi Government | मोदी सरकारने केला औषधांच्या दरांमध्ये बदल ! ‘ही’ 39 औषधे होणार स्वस्त, तर 16 महागणार; तपासून घ्या यादी

Pune Police | ‘मोक्का’तील फरार ‘तुफानसिंग’ला कर्नाटकातून अटक, विशेष शाखेच्या स्पेशल सेलची कारवाई