Modi Government | भारतातून चोरीला गेलेला 75 % वारसा मोदी सरकारच्या 7 वर्षात परत आला – जी किशन रेड्डी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Modi Government | केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांनी गुरुवारी म्हटले की, भारतातून चोरीला गेलेला 75 टक्के वारसा नरेंद्र मोदी सरकारच्या (Modi Government) सात वर्षादरम्यान परत मिळवला आहे. राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात रेड्डी यांनी म्हटले की, 1976 पासून आतापर्यंत परदेशांतून एकुण 54 वस्तु परत आणल्या आहेत.

केंद्रीय मंत्र्यांनी म्हटले, ही अभिमानाची गोष्ट आहे की, आम्ही आपला चोरीला गेलेला अनेक प्रकारचा वारसा परदेशातून प्राप्त करण्यात सक्षम ठरलो.
मागील सात वर्षात ताब्यात घेतलेल्या पुरातन अवशेषांची संख्या आतापर्यंत सर्वात जास्त आहे.
2014 च्या नंतर भारतात 41 वारसा वस्तू परत आणल्या गेल्या,
ज्या परत केलेल्या वस्तूंच्या 75 टक्केपेक्षा जास्त आहे.

रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याचे श्रेय देत म्हटले की, पीएमच्या अथक प्रयत्नामुळे परदेशातून हे पुरातन अवशेष पुन्हा मिळाले.
मला वाटते की, हे यश आपल्या सुधारलेल्या संबंधामुळे आहे.
आपल्या पंतप्रधानांच्या विविध राष्ट्राध्यक्षांशी असलेल्या घनिष्ठ व्यक्तीगत संबंधामुळे हे शक्य झाले आहे.

रेड्डी यांनी गंभीर आरोप केला की, नेहरू-गांधी कुटुंबाचे नेते भारताच्या सांस्कृतिक आणि वारसागत संपत्तीचे रक्षण करण्याऐवजी स्वतासाठी पैसा कमावण्यात जास्त रस दाखवत होते.
रेड्डी यांनी म्हटले, 1976 च्या नंतर काँग्रेस सरकारने जवळपास 25 वर्ष राज्य केले,
10 पेक्षा कमी प्राचीन वस्तू परत आणू शकले.
हे प्रतिबद्धता आणि अभिमानाची कमतरता दर्शवते.

रेड्डी यांनी या प्रयत्नात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय), केंद्रीय तपास संस्था (सीबीआय) सारख्या विविध सरकारी एजन्सीजच्या अथक परिश्रमांचे कौतूक केले.

 

Web Title : Modi Government | g kishan reddy said 75 pc stolen heritage returned during 7 years of pm modi govt

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Driving Licence | सरकारचा मोठा निर्णय ! ड्रायव्हिंग लायसन्सचे बदलले नियम, आता एनजीओ आणि खाजगी कंपन्यासुद्धा जारी करू शकतील DL

Covid 19 | केंद्राने मुख्य सचिवांना पाठवला संदेश, वाढत्या प्रकरणांबाबत रहा अलर्ट; सणासुदीत Lockdown लावण्यासाठी करू नये ‘संकोच’

Amruta Fadnavis | महाविकास आघाडी सरकारची आवडणारी गोष्ट कोणती? ‘या’ हटक्या शैलीत अमृता फडणवीसांचं उत्तर (व्हिडीओ)