Modi Government | मोदी सरकार देतंय घरबसल्या 15 लाख रुपये जिंकण्याची संधी, तुम्हाला करावे लागेल केवळ ‘हे’ काम; जाणून घ्या
नवी दिल्ली : जर तुम्हाला घरबसल्या पैसे कमवायचे असतील तर चांगली संधी आहे. मोदी सरकार (Modi Government) लोकांना 15 लाख रुपये जिंकण्याची संधी देत आहे. यूनियन बजेट 2021 मध्ये, केंद्राने विशेष प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चरच्या फंडिंगसाठी एक डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टीट्यूशन (DFI) बनवण्याच्या योजनेची घोषणा केली होती. केंद्राने (Modi Government) नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन (NIP) च्या अंतर्गत 2024-25 पर्यंत 7000 पेक्षा जास्त योजनांवर 111 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना बनवली आहे.
Modi Government | get rs 15 lakh for giving a name tagline and logo for development financial institution
My Gov India च्या ऑफिशियल ट्विटर हँडलवर याबाबत माहिती दिली आहे. या योजनांची कार्यक्षमता आणि पूर्ण होण्यासाठी वेळेवर मोठ्या निधीची आवश्यक असेल. यामध्ये तुम्ही 15 ऑगस्ट 2021 पर्यंत अर्ज करू शकता. या स्पर्धेत जिंकणार्या व्यक्तीला 15 लाख रुपयांचे इनाम मोदी सरकार देईल.
Put on your creative hat and stand a chance of winning a cash prize of ₹5,00,000 for each category!
Participate in Name, Tagline and Logo contest for Development Financial Institution.
Visit: https://t.co/VdrHvzPCEb@PMOIndia @FinMinIndia @PIB_India @MIB_India pic.twitter.com/QVlfJ55Y7B
— MyGovIndia (@mygovindia) July 27, 2021
करावे लागेल हे काम
डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस, अर्थ मंत्रालयाने लोकांना डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टीट्यूशन (DFI) संस्थेचे नाव, एक टॅगलाईन सूचवणे आणि याच्या एका लोगोचे डिझाईन मागवले आहे. संस्थेचे नाव, लोगो आणि टॅगलाइन, तिच्या कामानुसार असावी.
नाव, टॅगलाईन आणि लोगोने डेव्हलपमेंट फायन्शियल इन्स्टीट्यूशनच्या स्थापनेमागील उद्देशाचे प्रतिनिधीत्व केले पाहिजे. आणि हे स्पष्ट मार्कर असावे की काय करणार/करू शकते. हे प्रत्यक्षात एक व्हर्च्युअल सिग्नेचर प्रमाणे असावे, जे लक्षात ठेवणे उच्चारण्यास सोपे असावे. तीनही नावे, टॅगलाईन आणि लोगोपैकी प्रत्येक वेगळे असावे, परंतु एक सिनरगाईज्ड अप्रोचचे प्रतिनिधीत्व करेल.
अशाप्रकारे करू शकता रजिस्ट्रेशन
या कॉन्टेस्टमध्ये भाग घेण्यासाठी तुम्हाला सर्व प्रथम mygov.in पोर्टलवर जावे लागेल. येथे काँटेस्टमध्ये जाऊन लॉग इन टू पार्टिसिपेट टॅबवर क्लिक करावे लागेल. यानंतर रजिस्ट्रेशन डिटेल्स भराव्या लागतील. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला तुमची एंट्री दाखल करावी लागेल.
जाणून घ्या कुणाला काय मिळेल बक्षीस
– संस्थेचे नाव
या संस्थेचे नाव सूचवणार्यास प्रथम पुरस्कार 5,00,000 रुपये, द्वितीय पुरस्कार 3,00,000 रुपये आणि तृतीय पुरस्कार 2,00,000 रुपये आहे.
– टॅगलाईन
टॅगलाईनसाठी प्रथम पुरस्कार 5,00,000 रुपये, द्वितीय पुरस्कार 3,00,000 रुपये आणि तृतीय पुरस्कार 2,00,000 रुपये आहेत.
– लोगो
तर, लोगोसाठी सुद्धा प्रथम पुरस्कार 5,00,000 रुपये, द्वितीय पुरस्कार 3,00,000 रुपये आणि तृतीय पुरस्कार 2,00,000 रुपये आहे.
ATM Transaction Fee | बदलला एटीएममधून कॅश काढण्याचा नियम, जाणून घ्या फ्रीमध्ये किती काढू शकता ‘कॅश’