खुशखबर ! केंद्राकडून सणांपूर्वीच सरकारी कर्मचार्‍यांना भेट, 2 वर्षांसाठी वाढवला ‘हा’ भत्ता

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. या दरम्यान, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने केंद्रीय कर्मचार्‍यांना सणासुदीच्या काळात मोठी भेट दिली आहे. कामगार राज्यमंत्री जितेंद्र सिंहने यांनी सांगितले की, सरकारने केंद्रीय कर्मचार्‍यांना पूर्वोत्तर, लडाख, अंदमान निकोबार बेटे आणि जम्मू-काश्मीरच्या प्रवासासाठी लीव्ह ट्रॅव्हल अलाऊंस (एलटीए) ची सुविधा दोन वर्षांसाठी वाढवली आहे.

25 सप्टेंबर 2022 पर्यंत वाढवली सुविधा
जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, कर्मचार्‍यांना एलटीसीसाठी पेड हॉलिडेच्या सोबत येण्या-जाण्यासाठी ट्रॅव्हल अलाऊंन्स दिला जाईल. याशिवाय, या राज्यांचा प्रवास प्रायव्हेट एयरलाइन्स कंपन्यांद्वारे सुद्धा करता येईल. केंद्रीय कर्मचारी विमान प्रवासासाठी इकोनॉमी क्लासचे तिकिट बुक करू शकतात. कामगार राज्यमंत्र्यांनी म्हटले की, नॉन-एलिजिबल गव्हर्नमेंट एम्प्लॉय सुद्धा एयर ट्रॅव्हल करू शकतात. ही सुविधा 25 सप्टेंबर 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

या सुविधेचा लाभ घेत सरकारी कर्मचारी किंवा अधिकारी आपल्या कुटुंबासह किंवा एकट्याने फिरण्यासाठी जाऊ शकतात. प्रवासादरम्यान होणारा खर्च सुद्धा एलटीए अंतर्गत दिला जाईल. मात्र, कोरोना संकटामुळे यावेळी केंद्रीय कर्मचार्‍यांना महागाई भत्ता वाढवण्यात आलेला नाही.

सध्या 17 टक्के महागाई भत्ता
केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी वर्षातून दोनदा वाढवण्यात येणारा महागाई भत्ता यावेळी कोरोनामुळे जुन्या दरानेच दिला जात आहे. महागाई भत्ता जानेवारी 2020 मध्ये 4 टक्के वाढवला होता. यानंतर महागाई भत्ता 21 टक्के झाला होता. त्यानंतर कोरोनामुळे यात वाढ करण्यात आली नाही. 30 जून 2021 पर्यंत महागाई भत्ता 17 टक्के दराने दिला जात आहे. जानेवारी आणि जुलैमध्ये महागाई भत्ता वाढवला जातो.