मोदी सरकारचा ‘आयकर’धारकांना मोठा दिलासा, यापुढं सरकार ‘हे’ काम करणार नाही, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने कमी कर भरणाऱ्यांसाठी एक दिलासा दिला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात यासाठी सरकरने दिलासा दिला आहे. यासाठी आयकर घेण्याच्या नियमांमध्ये बदल करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. यापुढे कमी कर भरणाऱ्या आयकरधारकांना सरकार न्यायालयात खेचणार नाही. यापुढे १० हजार रुपयांच्या पुढेच कर चोरी केली तरच आयकर विभाग कोर्टात खेचणार आहे. त्याचबरोबर जर नोटिशींचे उत्तर दिले नाही तर आयकर विभागाकडे कायदेशीर कारवाईचे आधिकार देण्यात आले आहेत. यासाठी सरकार लवकरच नवीन नियम बनवणार आहे.

५ जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी भाषणात यासाठी नवीन नियम करण्यात येणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर आता सरकारने यावर काम सुरु केले असून लवकरच याची अंमलबजावणी करण्यात येईल.

टॅक्स चोरीसाठी नवीन नियम
या केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने टॅक्सचोरी रोखण्यासाठी देखील पावले उचलली आहेत. यापुढे सरकार तुमच्या बँक खात्याबरोबरच विदेश प्रवास आणि विजेच्या बिलावर देखील नजर ठेवणार आहे. त्याचबरोबर तुम्ही बँकेत १ कोटी रुपयांपेक्षा अधिक रुपयांचा व्यवहार केला असेल आणि तुमचे वार्षिक उत्पन्न ५ लाख रुपये असेल तरीदेखील तुम्हाला इनकम टॅक्स रिटर्न भरावा लागेल.

आरोग्यविषयक वृत्त

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

पेरू खाल्यामुळं ‘हा’ आजार मुळापासून होतो ‘गायब’

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

‘व्होडका’त अनेक औषधी गुणधर्म, विविध समस्यांवर लाभदायक !

लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like