Modi Government | 12 कोटी लोकांवर मोदी सरकार होणार मेहरबान, वार्षिक मिळतील 12000 रुपये; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Modi Government | कोरोना व्हायरस संसर्ग महामारीमध्ये सामान्य लोकांचे जीवन आणि उद्योगाचे मोठे नुकसान झाले आहे. कारखाने बंद झाल्याने कामगारांना मिळत नाही, ज्यामुळे आर्थिक संकटाचे सावट आहे. केंद्र आणि राज्य सरकारने (Modi Government) गरीबांना मोफत रेशन देऊन मदत केली, परंतु समस्या कायम आहे.

छोट्या-छोट्या शेतकर्‍यांना सुद्धा या काळातून जाताना अनेक हालआपेष्टांना तोंड द्यावे लागले. आता अशावेळी पीएम मोदी सरकार पुन्हा एकदा छोट्या-सीमांत शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे येत असल्याचा दावा केला जात आहे. केंद्र सरकार पीएम किसान सम्मान निधी अंतर्गत 9वा हप्ता शेतकर्‍यांच्या खात्यात पाठवला आहे.

या योजनेचा फायदा घेणार्‍या लाभार्थ्यांसाठी आणखी एक खुशखबर आहे की, सरकार हप्त्याची रक्कम वाढवण्याची तयारीत आहे. सरकार पीएम किसान सम्मान निधीची रक्कम डबल करणार आहे, असा दावा केला जात आहे.

हप्ता जर डबल झाला तर आता वार्षिक 6000 वरून वाढून 12000 रुपये मिळतील. हप्तासुद्धा 2000 रुपयांनी वाढून थेट 4000 होईल. सरकारने अधिकृत प्रकारे ही घोषणा केलेली नाही, परंतु काही मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा केला जात आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, बिहारचे कृषी मंत्री अमरेंद्र प्रताप सिंह यांनी नुकतीच दिल्लीत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली, ज्यामध्ये पीएम किसान सम्मान निधी योजनेंतर्गत मिळणारी रक्कम दुप्पट करण्यावर सुद्धा चर्चा केली आहे. मात्र यावर केंद्राकडून अजून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

तुम्ही सुद्धा किसान सम्मान निधी लाभार्थी शेतकरी असाल आणि काही कारणामुळे तुमच्या खात्यात 9व्या हप्त्याचे पैसे आले नसतील तर अस्वस्थ होण्याची गरज नाही. तुम्ही पीएम किसान योजनेच्या टोल फ्री हेल्पलाईन नंबरवरून योजनेशी संबंधीत कोणतीही तक्रार दाखल करू शकता. कोणत्या कारणामुळे तुमचे अडकले आहेत याची माहितीही तुम्हाला मिळू शकते.

 

– असे चेक करा आपले नाव

1. सर्वप्रथमच अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जा.

2. होमपेजवर Farmers Corner चा ऑपशन दिसेल.

3. Farmers Corner सेक्शनमध्ये Beneficiaries List ऑपशनवर क्लिक करा.

4. नंतर ड्रॉप डाऊन लिस्टमधून राज्य, जिल्हा, उप जिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.

5. यानंतर Get Report वर क्लिक करा.
नंतर लाभार्थ्यांची पूर्ण लिस्ट समोर येईल, ज्यामध्ये तुमचे नाव शोधा.

 

– कॉल करून घ्या सर्व माहिती

PM किसान सन्मान योजना लँडलाइन क्रमांक- 011r23381092, 23382401

पीएम किसान सन्मान योजना टोल पूर्व क्रमांक- 18001155266

पीएम किसान योजना हेल्पलाईन क्रमांक- 155261, 0120-6025109

Web Title : modi government going be kind 12 crore people

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 154 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Earn money | YouTube चा ‘हा’ प्रोग्राम 20 लाख लोकांसाठी बनला इन्कमचे माध्यम, तुम्ही सुद्धा यातून करू शकता लाखोंची कमाई; जाणून घ्या

Pune Corporation Amenity Space | अ‍ॅमिनिटी स्पेस बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव पुणेकर कदापि सहन करणार नाहीत – काँग्रेसचे गटनेते आबा बागुल