Modi government | शेतकर्‍यांसाठी खुशखबर ! मोदी सरकारकडून आता 2000 रुपयांऐवजी 4000 रुपये मिळणार, PM Kisan चा लाभ दुप्पट?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  मोदी सरकारने (Modi government) शेतक-यांच्या हितासाठी पीएम शेतकरी सन्मान निधी योजना (PM kisan Samman Nidhi) आमंलात आणली. तेव्हापासुन देशातील कोट्यावधी शेतक-याला या योजनेचा लाभ होतो आहे. या योजनेचा लाभ घेणा-या शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. कारण आता शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांऐवजी 4000 रुपये येण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत (PM kisan Samman Nidhi) शेतकऱ्यांना मिळणारी आर्थिक मदत सरकार (Modi government) आता दुप्पट करण्याचा विचारात आहे. यावरुनच आताच्या वाढीव लाभामुळे शेतकऱ्यांना 6000 रुपयांऐवजी 12000 रुपये मिळण्याची शक्यता आहे.

पीएम शेतकरी सन्मान निधी (PM kisan Samman Nidhi) योजना देशातील गरीब शेतकऱ्यांना (Farmers) बी-बियाणं, खतं खरेदी करण्याकरता निधी मिळावा याकरता राबवली जाते.
दरम्यान आताच्या या वाढीव योजनेबाबत लवकरच मोदी सरकार शेतक-यांसाठी एक भेट देणार आहे. दरम्यान, बिहारचे कृषिमंत्री अमरेंद्र प्रताप सिंह (Amarendra Pratap Singh) यांनी अलीकडेच दिल्लीमध्ये केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Union Agriculture Minister Narendra Singh Tomar) आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Niramala Sitharaman) यांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान पीएम शेतकरी सन्मान निधीचे पैसे दुप्पट करण्याबाबत देखील चर्चा करण्यात आली.
दरम्यान, अजुन यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

देशातील शेतकऱ्यांना 6 हजार रुपयांचा लाभ –

मोदी सरकार कडून (Modi Government) पीएम शेतकरी सन्मान निधी (PM kisan Samman Nidhi) या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 6000 रुपये 3 हप्त्यांत पाठवले जातात.
2000 रुपयांचे 3 हप्ते शेतकऱ्यांना पाठवले जातात.
ही योजना 2019 मध्ये मोदी सरकारने सुरू केली होती. या योजनेअंतर्गत वर्षातील 2 हजार
प्रमाणे पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै, दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता
1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान पाठवला जातो.

 

पीएम किसान जीओआय अ‍ॅपवर नोंदणी करु शकता…

या योजनेचा (PM kisan Samman Nidhi) लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्याला ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे.
त्यामुळे पीएम किसानच्या www.pmkisan.gov.in या ऑनलाइन पोर्टलवरून किंवा मोबाइल अ‍ॅपवरून नोंदणी करू शकता.
या योजनेच्या सीमा वाढवण्यासाठी National Informatics Centre ने मोबाइल अ‍ॅप डेव्हलप आणि डिझाइन केले आहे.
तसेच, तुम्ही पोस्ट ऑफिस सीएससी काउंटर (Post Office CSC counters) वरूनही नोंदणी करू शकणार आहे.

या टोल फ्री नंबरवर संपर्क साधा…

हेल्पलाइन नंबर 011-24300606/011-23381092

पीएम-किसान हेल्प डेस्क चा ई-मेल [email protected] (केवळ सोमवार ते शुक्रवार)

 

Web Title : Modi Government | good news for farmers pm kisan samman nidhi beneficiary farmers will get 4000 rs instead of 2k know the reason

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

CNG-PNG Prices | सर्वसामान्यांना पुन्हा बसणार झटका ! पुढील महिन्यात 10-11 % वाढू शकतात CNG चे दर

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 294 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Saki Naka Rape Case | ही घटना दुर्दैवी; साकीनाका बलात्कार प्रकरणाचा तपास 1 महिन्यात – CP हेमंत नगराळे