शेतकर्यांसाठी मोठी खुशखबर ! मोदी सरकार देत आहे 4000 रूपये मिळवण्याची संधी, पहा डिटेल
नवी दिल्ली : वृत्त संस्था – मोदी सरकारने (Modi Government) शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या हेतूने अनेक योजना सुरू केल्या आहेत. या योजनांपैकी एक पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan samman nidhi 2021) आहे. सरकारची ही एक अशी योजना आहे, ज्यामध्ये मोदी सरकार (Modi Government) शेतकर्यांच्या खात्यात थेट पैसे पाठवले जातात. शेतकर्यांच्या खात्यात वार्षिक 6,000 रुपये ट्रान्सफर केले जातात. सरकार हे पैसे तीन समान हप्त्यात पाठवते. म्हणजे केंद्र सरकार प्रत्येक हप्त्यात 2,000 हजार रुपये ट्रान्सफर (Transfer) करते. सरकार त्याच शेतकर्यांच्या खातयात पैसे पाठवते, ज्यांच्याकडे किमान 2 हेक्टर शेतीयोग्य जमीन आहे.
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update
खात्यात येतील 4,000 रुपये
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्यांना रजिस्ट्रेशन करावे लागते. यानंतर थेट बँक खात्यात पैसे पाठवले जातात. आतापर्यंत शेतकर्यांना 8 हप्त्यांत पैसे पाठवले आहेत. या योजनेत एकुण 9.5 कोटी शेतकर्यांना 20 हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. मात्र, अजूनही अनेक शेतकरी आहेत त्यांनी नोंदणी केलेली नाही. सरकार शेतकर्यांना 30 जूनपर्यंत दुप्पट फायदा घेण्याची संधी दत आहे. यातून तुमचा फायदा हा होईल की, दोन्ही हप्ते एकाचवेळी अकाऊंटमध्ये येतील, म्हणजे थेट 4,000 रुपये तुमच्या खात्यात येतील.
यासाठी 30 जून 2021 पर्यंत रजिस्ट्रेशन करावे लागेल. आता 15 दिवस शिल्लक आहेत. 30 जूनच्या पूर्वी रजिस्ट्रेशन केल्यास शेतकर्यांना जुलैमध्ये आठवा हप्ता 2,000 रुपये पाठवला जाईल. रजिस्ट्रेशन करणार्या शेतकर्यांचा हा पहिला हप्ता असेल, तर सरकारकडून आठवा हप्ता असेल. नववा हप्ता ऑगस्टमध्ये जारी केला जाईल. यामुळे 30 जूनपूर्वी रजिस्ट्रेशन करणार्या शेतकर्यांना पहिला हप्ता जुलैमध्ये आणि दुसर्या हप्ता ऑगस्टमध्ये मिळेल. एकुण शेतकर्यांना थेट 4,000 रुपयांचा फायदा होईल. मात्र, रजिस्ट्रेशन केल्यास केवळ त्याच शेतकर्यांना लाभ मिळेल, ज्यांना अजूनपर्यंत एकही हप्ता मिळालेला नाही.
असे करा रजिस्टेशन (PM Kisan Samman Nidhi registration)
1 सर्वप्रथम PM Kisan ची अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर व्हिजिट करा.
2 यानंतर Farmers Corner नावाचे एक ऑपशन दिसेल, त्याच्या खाली New Farmer Registration चे ऑपशन दिसेल, त्यावर क्लिक करायचे आहे.
3 यानंतर नवीन पेज ओपन होईल. ज्यामध्ये तुम्हाला Aadhaar number आणि Captcha भरावा लागेल, नंतर काही व्यक्तीगत माहिती भरावी लागेल.
4 आधारशिवाय रजिस्ट्रेशन होणार नाही.
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update
Web Title :good news for kisan pm kisan credited 4000 rupees in farmers account check details varpat
16 जून राशिफळ : ‘या’ 6 राशींसाठी दिवस खास, लाभ होईल, इतरांसाठी असा आहे बुधवार