Modi Government | खुशखबर ! 15 दिवसानंतर आठवड्यात केवळ 4 दिवस काम आणि 3 दिवस सुटी, ‘टेक होम सॅलरी’ होणार कमी; ‘हे’ नियम होणार लागू

नवी दिल्ली : Modi Government | नोकरदार लोकांच्या कामात पुढील महिन्यात बदल होणार आहेत. मोदी सरकार (Modi Government) 1 ऑक्टोबरपासून लेबर कोडचे नियम लागू करू शकतात. लेबर कोडच्या नियमातून (New Wage Code) कर्मचार्‍यांना आठवड्यात 3 दिवस सुटीचा पर्याय मिळू शकतो.

आठवड्यात पाच किंवा सहा दिवसांऐवजी केवळ 4 दिवस काम करावे लागेल. मात्र, यामध्ये तुमच्या कामाचे तास 9 वरून वाढवून 12 करण्यात आले आहेत.

12 तासाची होऊ शकते नोकरी

नवीन ड्राफ्ट कायद्यात कामकाजाचे कमाल तास वाढवून 12 करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. मात्र, लेबर युनियन 12 तास नोकरी करण्यास विरोध करत आहे. कोडच्या ड्राफ्ट नियमात 15 ते 30 मिनिट दरम्यानच्या कामाला सुद्धा 30 मिनिट मोजून ओव्हर टाइममध्ये समावेश करण्याची तरतूद आहे.

सध्या 30 मिनिटापेक्षा कमी वेळेला ओव्हर टाइम मानले जात नाही. ड्राफ्ट नियमात कर्मचार्‍यांना 5 तास सलग काम केल्यानंतर अर्धातास विश्रांती द्यायची आहे.

आठवड्यात 3 दिवस मिळेल सुटी

नवीन लेबर कोडच्या नियमात पर्याय सुद्धा ठेवला जाईल, ज्यात कंपनी आणि कर्मचारी आपसातील सहमतीने निर्णय घेऊ शकतात.
नवीन नियमांतर्गत काम करण्याच्या तासांची आठवड्याची कमाल मर्यादा 48 तास ठेवली आहे.

यामुळे कामाचे दिवस 5 वरून 4 होऊ शकतात. आठवड्यात तीन दिवस सुटी मिळेल.
लेबर मिनिस्ट्री आणि मोदी सरकार लेबर कोडचे नियम 1 ऑक्टोबरपासून नोटीफाय करू शकते.

टेक होम सॅलरी कमी होणार

नवी ड्राफ्ट रूलनुसार, मूळ वेतन एकुण वेतनाच्या 50% किंवा जास्त असावे. यामुळे बहुतांश कर्मचार्‍यांच्या वेतनाच्या रचनेत बदल होईल.

बेसिक सॅलरी वाढल्याने पीएफ आणि ग्रॅच्युएटीसाठी कापले जाणारे पैसे वाढतील, कारण यामध्ये जाणारे पैसे बेसिक सॅलरीच्या प्रमाणात असतात.
जर असे झाले तर घरी येणारा पगार कमी होईल. तर रिटायर्मेंटनंतर मिळणारे पैसे वाढतील.

हे देखील वाचा

Manohar Mama Bhosale | मनोहर मामा भोसलेचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला

पेन्शनधारकांसाठी खुशखबर ! SBI च्या ‘या’ सर्व्हिसद्वारे घसरबसल्या मिळतील ‘या’ सर्व सुविधा; जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Modi Government | good news modi govt change working days of employees 3 days week off from 1st october check

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update