मोदी सरकारचं मोठं यश ! Google, Facebook, ट्विटर भारतातच ठेवणार तुमचा डाटा, ‘या’ शहरात बनणार सेंटर

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   आता गुगल (Google), फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter) आणि अमेझॉन (Amazon) सारख्या मोठ्या कंपन्या भारतातच आपले डाटा सेंटर बनवतील. यासाठी उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये पहिले डाटा सेंटरचे बांधकाम सुरू झाले आहे. नोएडामध्ये सुमारे 600 कोटी रूपयांच्या खर्चाच्या डाटा सेंटरच्या पायाभरणीसह सीएम योगी आदित्यनाथ यांनी परदेशी डाटा ठेवण्याचे अवलंबत्व सुद्धा संपवण्याकडे पाऊल टाकले आहे. मुंबईचा हिरानंदानी समूह 20 एकर भूखंडावर हे डाटा सेंटर उभारणार आहे.

डाटा सेंटरमुळे 22,000 लोकांना मिळेल प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार

उत्तर प्रदेश सरकारचे म्हणणे आहे की, या डाटा सेंटर पार्कमधून 2,000 तरूणांना प्रत्यक्ष रोजगार मिळू शकतो. तर, उत्तर भारतातील या सर्वात मोठ्या डाटा सेंटरद्वारे 20,000 पेक्षा जास्त लोकांना अप्रत्यक्ष रोजगार आणि व्यवसाय मिळण्याची संधी आहे. या योजनेतून युपी आणि अन्य ठिकाणी काम करत असलेल्या आयटी कंपन्यांना सुद्धा खुप मदत मिळेल. कोरोना संकटात डाटा सेंटरसाठी जमीन अधीग्रहणाचे काम पूर्ण करण्यात आले होते. जून 2022 पर्यंत नोएडामध्ये तयार होत असलेल्या या डाटा सेंटरचे काम सुरू होईल. सेंटर सुरू झाल्यानंतर गुगल, अमेझॉन, फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्राम आणि सेंट्रल कोर्टसह देश-जगातील अनेक कंपन्या भारतीय यूजर्सचा डटा भारतातच ठेवू लागतील.

युपी सरकारला मिळाले 10,000 कोटी रूपयांचे गुंतवणूक प्रस्ताव

रॅक बँक, अदानी समूहासह अनेक कंपन्यांनी डाटा सेंटरच्या क्षेत्रात 10,000 कोटी रुपयांच्या मोठ्या रक्कमेच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव युपी सरकारला दिला आहे. योगी सरकारने यासाठी तयारी सुरू केली आहे. भारतात आवश्यक डाटा सेंटर नसल्याने भारतीय यूजर्सचा डाटा परदेशात ठेवला जातो. डाटा सेंटर पार्क बनल्यानंतर इंडियन यूजर्सचा डाटा भारतातच सुरक्षित ठेवला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपक्रमावर काही काळापासून देशभरात अशाप्रकारचे डाटा सेंटर बनवण्याची योजनेवर काम होत आहे. कॅबिनेट मंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांनी सांगितले की, हे उत्तर भारतातील सर्वात आधुनिक आणि मोठे डाटा सेंटर असेल. आगामी काळात राज्याच्या दुसर्‍या भागात सुद्धा अशी डाटा सेंटर बनतील.

डाटा सेंटरचा कंपन्या या कामासाठी करतात वापर

डाटा सेंटर नेटवर्कशी संबंधीत कम्प्युटर सर्व्हरचा मोठा समुह आहे. कंपन्या डाटा स्टोरेज, प्रोसेसिंग आणि डिस्ट्रीब्यूशनसाठी याचा वापर करतात. उत्तर प्रदेशात फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्राम, यूट्यूब सारख्या सोशल मीडिया प्लॅटफार्मचे कोट्यवधी ग्राहक आहेत. या यूजर्सशी संबंधीत डाटा सुरक्षित ठेवणे महाग आणि अवघड काम असते. याशिवाय बँकिंग, रिटेल बिझनेस, आरोग्य सेवा, यात्रा, पर्यटनासह आधार कार्ड डाटासुद्धा खुप महत्वाचा आहे. हे सुद्धा याच डाटा सेंटरमध्ये सुरक्षित ठेवता येईल.