Modi Government | मोदी सरकारकडून ऊस उत्पादकांना मोठा दिलासा ! साखर कारखान्यांचा 8 हजार 400 कोटींचा प्राप्तिकर माफ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Modi Government | देशातील साखर कारखान्यांवर (Sugar Factory) आकारलेला प्राप्तिकर (Income Tax) माफ करण्याचे आदेश केंद्र सरकारमधील गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी दिले आहेत. त्यासंदर्भात 5 जानेवारीला सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेशनने Central Board of Direct Taxation (CBDT) परिपत्रक जारी केले आहे. त्यामुळे तब्ब्ल कारखान्यांचे 8 हजार 400 कोटी रुपये माफ झाले असून मोदी सरकारकडून (Modi Government) ऊस उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे, अशी माहिती माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी दिली आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) यासंदर्भात दाखल करण्यात आलेले सर्व दावे प्राप्तिकर विभागाकडे (Income Tax Department) सुनावणी होऊन निकाली काढण्यात येणार आहेत.

 

साखर उद्योगाला संकटातून बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारशी (Modi Government) चर्चा करून मार्ग काढावा अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे 4 ऑक्टोबरला केली होती असे सांगत हर्षवर्धन पाटील म्हणाले की, 19 ऑक्टोबरला फडणवीस, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यावेळी यासंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली. त्यानंतर 25 ऑक्टोबरला केंद्र सरकारने परिपत्रक काढून 2016 पासून दिलेल्या नोटिसा रद्द करण्याचा आदेश काढला.

मात्र 2016 पूर्वी काढलेल्या नोटिसा कायम होत्या.
त्यामुळे पुन्हा एकदा शिष्टमंडळाने अमित शाह यांची भेट घेऊन हि बाब निदर्शनास आणून दिली.
विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) हे सुद्धा सकारात्मक होते.
त्याअनुषंगाने हालचाली सुरु झाल्या. अमित शहा यांनी फेरआढावा घेतला. त्यानंतर केंद्रीय वित्त मंत्रालयाचे अवर सचिव सौरभ जैन (Saurabh Jain) यांनी सुधारित परिपत्रक काढून साखर कारखान्यांना दिलेल्या नोटिसा रद्द (Notice cancel) करण्याचे आदेश दिले आहेत.

 

राज्यातील 40 लाख शेतकऱ्यांना दिलासा
प्राप्तिकर विभागाने राज्यातील 116 साखर कारखान्यांना नोटीस दिल्या होत्या.
त्यासंदर्भात 1990 पासून दावे दाखल आहेत.
मात्र आता या नव्या परिपत्रकामुळे राज्यातील जवळपास 40 लाख तर देशातील 5 कोटी ऊस उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
देशाचे सहकारमंत्री अमित शहा यांनी घेतलेला निर्णय क्रांतिकारक असून साखर उद्योगातून या निर्णयाचे स्वागत होत आहे.
या निर्णयामुळे ऊस उत्पादक आणि ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक बळकट होणार आहे. असेही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

 

Web Title :- Modi Government | Great relief to sugarcane growers from Modi government! 8400 crore income tax exemption for sugar factories

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nude Photography | ‘न्यूड फोटोग्राफी’ ही कला नाही का? पुण्यातील ‘बालगंर्धव’मध्ये प्रदर्शन भरवल्यावर तरुणाला आंदोलनाची धमकी

 

Rajesh Tope | राज्यात लॉकडाऊन होणार नाही? राजेश टोपेंची महत्त्वाची माहिती