Modi Government | मोदी सरकारचा मोठा निर्णय, रिटर्न न भरणारे 15 ऑगस्टपासून करू शकणार नाहीत हे काम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Modi Government | जीएसटी नेटवर्क (GSTN) ने म्हटले आहे की ज्या करदात्यांनी (Taxpayers) जून 2021 पर्यंत दोन महिने किंवा जून 2021 तिमाहीपर्यंत जीएसटी रिटर्न (GST Return) दाखल केलेला नाही, ते 15 ऑगस्टपासून ई-वे बिल (e-Way Bill) जनरेट करू शकणार नाहीत. एक्सपर्टचे म्हणणे आहे की या पावलांनी ऑगस्टमध्ये गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स (GST) कलेक्शन वाढवण्यात मदत होईल, कारण प्रलंबित जीएसटी रिटर्न दाखल होण्याची अपेक्षा (Modi Government) आहे.

मागच्या वर्षी केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्ड (CBIC) ने कोविड महामारीदरम्यान दिलासा देत रिटर्न दाखल न करणार्‍यांसाठी इलेक्ट्रॉनिक ई-वे बिल जनरेट करण्यावरील प्रतिबंध निलंबित केला होता.

EWB portal वर 15 ऑगस्टपासून पुन्हा सुरू होईल सर्व्हिस

जीएसटीएनने करदात्यांना म्हटले, सरकारने आता सर्व करदात्यांसाठी ईडब्ल्यूबी पोर्टल (EWB portal) वर ई-वे बिल जनरेट करण्यावरील प्रतिबंध 15 ऑगस्टपासून पुन्हा सुरळीत करण्याचा निर्णय घेतला आहे. अशाप्रकारे 15 ऑगस्ट 2021 च्यानंतर सिस्टम दाखल करण्यात आलेल्या रिटर्नची तपासणी करेल आणि आवश्यक असल्यास ई-वे बिल जनरेट करण्यावर प्रतिबंध लावू शकते.

जुलैमध्ये ई-वे बिलाचा विक्रम

गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स (GST) कलेक्शनच्यानंतर जीएसटीच्या अंतर्गत जारी होणार्‍या ई-वे बिलाने (E-way bills) सुद्धा विक्रम बनवला आहे.
जुलैमध्ये 6.4 कोटी ई-वे बिल जनरेट झाली आहेत, जी एप्रिलनंतर दुसरी सर्वात जास्त आहेत.
एप्रिलमध्ये विक्रमी 7.12 कोटी ई-वे बिल जनरेट झाली होती.

 

Web Title :  Modi Government | gstn e way generation to be blocked from august 15 for return non filers

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | पुण्यात ‘रो हाऊस’साठी गुंतवणूक केलेले पैसे परत न मिळाल्याने कॅटरिंग व्यावसायिकाची आत्महत्या

Zika Virus | पुणे जिल्ह्यातील झिका नियंत्रणात; केंद्रीय पथकाकडून पाहणी

SBI ग्राहकांचा प्रश्न – खात्यात किती रुपये ठेवण्याची आवश्यकता? जाणून घ्या याचे योग्य उत्तर