मोदी २.० सरकारची मोठी कारवाई : एकाच दणक्यात ‘आयकर’ विभागातील १२ ‘भ्रष्ट’ अधिकारी ‘बडतर्फ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भ्रष्टाचार आणि व्यावसायिक गैरवर्तणुकीचा आरोप असलेल्या १२ प्राप्तिकर अधिकाऱ्यांवर कारवाई करीत मोदी सरकारने त्यांना एका फटक्यात घरचा रस्ता दाखविला आहे. प्राप्तिकर विभागातील शक्तीशाली अधिकाऱ्यांवर देशात प्रथमच इतकी मोठी कारवाई केल्याचे मानले जात आहे. हे आयुक्त दर्जाचे अधिकारी अनेक न्यायिक छानण्यात दोषी आढळल्यानंतरही सेवेत कायम होते. या कारवाईसाठी सरकारने नियम ५६ अ नुसार मिळालेल्या आपत्कालीन अधिकाराचा वापर केला आहे. या अधिकाऱ्यांना बंडतर्फ करुन बंधनकारक निवृत्ती देण्यात आली आहे.

बडतर्फ करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांत १९८५ च्या आयआरएस तुकडीचे अधिकारी अशोक अग्रवाल यांचा समावेश आहे. ते ईडीमध्ये कार्यरत होते. त्यांच्याविरुद्ध अनेक खटले दाखल होते. नोएडा येथे अपील आयुक्त असलेले एस. के. श्रीवास्तव यांच्यावर आयुक्त दर्जाच्या दोन महिला आयआरएस अधिकाऱ्यांनी लैंगिक छळ केल्याच्या आरोपावरुन बडतर्फ करण्यात आले आहे.

मुंबईत प्राप्तिकर आयुक्त असलेले अजोयकुमार सिंग यांना सीबीआयने २००७ मध्ये अटक केली होती. २००९ मध्ये त्यांना निलंबितही करण्यात आले होते. इतके होऊनही ते गेल्या १० वर्षांपासून सेवेत कार्यरत होते. त्यांना आता कायमचे घरी पाठविण्यात आले आहे.

बी. आरुलप्पा हे वरिष्ठ अधिकारी अनेक खटल्यात अपयशी ठरल्यामुळे सरकारला १६ कोटी ६८ लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले होते. तर, आलोककुमार मित्रा यांचा भ्रष्टाचार आणि खंडणीच्या अनेक प्रकरणात सहभाग होता. त्यांनी दिलेले अनेक चुकीचे निर्णय अपील प्राधिकरणांनी नंतर फिरविले होते.

राजवंश यांच्यावर ३ कोटी १७ लाख रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या आरोपावरुन कारवाई करण्यात आली आहे. बी. बी. राजेंद्र प्रसाद यांना सीबीआयने लाचेच्या आरोपाखाली अटक केली होती. त्यांना २ मे २०१७ रोजी निलंबित केले होते. दक्षता आयोगाने त्यांच्याविरुद्ध २ कोटी ७३ लाख रुपये जमविल्याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते.

चंदर सैन भारती यांना सीबीआयने ३० लाख रुपये लाच घेताना पकडले होते. त्यांच्या व त्यांच्या पत्नीच्या नावावर १ कोटी ६३ लाख १२ हजार ९३९ रुपयांची बेहिशोबी मालमत्ता सापडली होती. अंदासू रविंदर यांना सीबीआयने ५० लाख रुपयांसह पकडले होते. अंदासू रविंदर यांनी चेन्नईच्या अर्बन ऑफशोअर लिमिटेडकडून लाच घेतली होती.

विवेक बात्रा यांच्याकडे १ कोटी २७ लाख रुपयांची बेहिशोबी मालमत्ता आढळली होती. स्वेताभ सुमन यांना एका व्यावसायिकाकडून ५० लाख रुपयांची लाच घेताना १३ एप्रिल २०१८ रोजी रंगेहाथ पकडले होते. या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी होऊन त्यात ते दोषी ठरले होते. तरीही त्यांच्यावर काहीही कारवाई झाली नव्हती.

आरोग्यविषयक वृत्त –

गरोदरपणा नंतरचा लठ्ठपणा नको ? मग ‘हे’ पाणी प्या

‘Sexsomnia’ने ग्रासित लोक झोपेमध्येही ‘हे’ करतात

अंघोळ करताना तुम्ही ‘या’ चूका तर करत नाही ना ?

‘या’ आयुवेर्दिक उपायांमुळे तणाव होईल दूर