खुशखबर ! 1.12 कोटी सरकारी कर्मचार्‍यांना मोदी सरकारची दिवाळी भेट, ‘एवढया’ टक्क्यांनी वाढणार पगार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त मोठी भेट दिली आहे. बुधवारी झालेल्या केंदीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्ता 5 % नी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता तो 12 % नी वाढून 17 % इतका झाला आहे. यामुळे 50 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे. तसेच 62 लाख पेन्शन धारकांना देखील याचा लाभ होणार आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांचा DA वाढवण्यासाठी मिळाली मंजुरी –
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कॅबिनेटच्या निर्णयाची माहिती देताना सांगितले की, महागाई भत्ता 5 % नी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी सांगितले की या आधी 2 – 3 टक्क्यांनीच महागाई भत्ता वाढवला जात असे. या निर्णयामुळे सरकारवर 16,000 कोटी रुपयांचा बोजा वाढणार आहे. वाढवलेला महागाई भत्ता 1 जुलै पासून लागू होणार आहे.

महागाई भत्ता म्हणजे नेमकं काय ? –
डियरनेस अलाउंस (DA) म्हणजेच महागाई भत्ता तो असतो जो सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांचे राहणीमान उत्तम बनवण्यासाठी दिला जातो.

ही रक्कम त्यासाठी दिली जाते की, महागाई वाढल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या राहणीमानात पैशांच्या अभावामुळे कोणतीही समस्या येऊ नये. हे पैसे सरकारी कर्मचाऱ्यांना, पब्लिक सेक्टरच्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना दिले जातात. महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांच्या वेतनावर अवलंबून असतो. हा भत्ता कर्मचाऱ्यांवर महागाईचा परिणाम कमी करण्यासाठी दिला जातो.

2006 मध्ये जेव्हा सहावा वेतन आयोग लागू झाला होता तेव्हा बेस इयर 2006 होते आणि याआधी बेस इयर 1982 होते. आता सरकारने ही व्यवस्था केली आहे की, बेस इयर प्रत्येक 6 वर्षानंतर बदलले जाईल.

Visit : Policenama.com