मोदी सरकारकडून मोठं गिफ्ट ! LPG गॅस सिलेंडरवर मिळणार दुप्पट ‘अनुदान’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एलपीजी (LPG) गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानंतर विरोधकांनी भाजपाला घेरले होते. मात्र आता मोदी सरकारने घरगुती गॅस ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. मोदी सरकारने घरगुती गॅस सिलेंडरवर दिले जाणारे अनुदान दुपटीने केले आहे. पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने गुरुवारी याबाबत निवेदन दिले गॅस वाढीचे कारण देखील सांगितले.

दरम्यान पेट्रोलियम मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे की, आतापर्यंत १४.२ किलो च्या सिलिंडरवर १५३.८६ रुपयांचे अनुदान मिळत होते, परंतु आता त्या अनुदानात वाढ करून २९१.४८ रुपये करण्यात आले आहे. याप्रकारेच पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत वितरित करण्यात आलेल्या कनेक्शनवर आतापर्यंत १७४.८६ रुपये प्रति सिलेंडरचे अनुदान मिळत असून त्या अनुदानास वाढवून ३१२.४८ रुपये प्रति सिलेंडर करण्यात आले आहे.

दिल्लीत विना अनुदानित देशांतर्गत एलपीजी १४.२ किलो च्या एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत १४४.५० रुपयांनी वाढ झाली आहे. तर विना अनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत ७१४ रुपयांवरून ८५८.५० रुपये करण्यात आली आहे.

LPG चे दर का वाढले

जानेवारी २०२० मध्ये एलपीजीची आंतरराष्ट्रीय किंमत ४४८ डॉलर प्रति एमटी पासून ५६७ डॉलर प्रति एमटीवर इतकी वाढल्याने घरगुती गॅसच्या किंमतीत वाढ झाली आहे.

२६ कोटींपेक्षा जास्त ग्राहकांना अनुदान

सरकारने म्हटले आहे की सध्याला २७.७६ कोटींपेक्षा जास्त कनेक्शनांसोबत राष्ट्रीय एलपीजी कव्हरेज सुमारे ९७ टक्के आहे आणि जवळपास २७.७६ कोटींमधून २६.१२ कोटी ग्राहकांच्या बाबतीत सरकारने ही वाढ केली आहे.