Advt.

‘लॉकडाऊन’ मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना झटका ! PF च्या व्याज दरात ‘कपात’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारने जनरल प्रॉव्हिडंट फंड (जीपीएफ) बद्दल मोठी घोषणा करत नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी (एप्रिल ते जून तिमाही) व्याज दरात कपात केली आहे. सांगितले गेले आहे की, १ एप्रिल २०२० ते ३० जून २०२० पर्यंत जीपीएफ आणि इतर फंडांवर ७.१% व्याज दिले जाईल, जे पूर्वी ७.९% निश्चित केले गेले होते. जीपीएफ किंवा जनरल प्रॉव्हिडंट फंड एक प्रॉव्हिडंट फंड खाते आहे जे केवळ सरकारी कर्मचारीच उघडू शकतात. निवृत्तीनंतरचे हे एक प्रकारचे नियोजन असते, कारण सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्याला याची रक्कम मिळते. सरकारी कर्मचारी त्यांच्या पगाराच्या १५ टक्क्यांपर्यंत जीपीएफ खात्यात योगदान देऊ शकतात.

सर्वात खास वैशिष्ट्य
जीपीएफ खात्याशी संबंधित एक वैशिष्ट्य आहे, ज्याला जीपीएफ अ‍ॅडव्हान्स देखील म्हटले जाते. हे जनरल प्रॉव्हिडंट फंडाच्या बचतअंतर्गत देण्यात आलेले इंटरेस्ट फ्री (व्याजमुक्त) कर्ज आहे. याला कर्ज यासाठी म्हणतात, कारण कर्जाची रक्कम नियमित मासिक हप्त्यांमध्ये परत दिली जाते. जीपीएफ खात्यातून अगोदर काढलेल्या रकमेवर कोणतेही व्याज दिले जात नाही. तुम्ही तुमच्या संपूर्ण करिअरमध्ये आवश्यक तितके जीपीएफ अ‍ॅडव्हान्स घेऊ शकता.

GPF (सेंट्रल सर्व्हिसेस)-General Provident Fund (Central Services)
काँट्रीब्युटरी PF (इंडिया)
ऑल इंडिया सर्व्हिसेस PF-All India Services Provident Fund
स्टेट रेल्वे PF-State Railway Provident Fund
जनरल PF (डिफेन्स सर्व्हिसेस)-General Provident Fund (Defence Services)
इंडियन ऑर्डनन्स डिपार्टमेंट PF-Indian Ordnance Department Provident Fund
इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरीज वर्कमॅन PF-Indian Ordnance Factories Workmen’s Provident Fund
इंडियन नेव्हल डॉकयार्ड वर्कमॅन PF-Indian Naval Dockyard Workmen’s Provident Fund
डिफेन्स सर्व्हिसेस ऑफिसर्स PF-Defence Services Officers Provident Fund
आर्म्ड फोर्सेस पर्सनल PF-Armed Forces Personnel Provident Fund

पेन्शन खाते
कर तज्ञ अनिल के. श्रीवास्तव यांच्या म्हणण्यानुसार, सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीच्या वेळी जीपीएफ खात्यात जमा झालेल्या रकमेचा निश्चित भाग मिळतो. त्यांना निवृत्तीवेतनात काही रक्कम देण्याचा देखील पर्याय आहे, जी त्यांना दरमहा पेन्शन म्हणून मिळते.

नॉमिनीचा पर्याय
जीपीएफ खाते उघडताना एखादा कर्मचारी कुटुंबातील सदस्याला नॉमिनीदेखील बनवू शकतो. यामुळे खातेदाराचा काही अपघात झाल्यास, नॉमिनीला जीपीएफ खात्याची रक्कम मिळते.

आयकर मध्ये किती फायदा?
पीएफ खात्यात कर्मचार्‍याने दिलेल्या योगदानात आयकर कलम ८० (सी) अंतर्गत केवळ दीड रुपये करमुक्त आहे. हा नियम सर्व प्रकारच्या पीएफ खात्यांना लागू आहे.

कोण उघडू शकते खाते?
भारत सरकार किंवा कर सरकारी कर्मचारी जनरल प्रॉव्हिडंट फंडमध्ये त्यांचे खाते उघडू शकतात. हे खाते एका विशिष्ट उत्पन्न गटाच्या कर्मचार्‍यांसाठी आवश्यक आहे. खासगी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी या खात्यास पात्र नसतात.