Modi Government | ‘या’ व्यवसायासाठी 5 लाखांची करा गुंतवणूक आणि मिळावा महिन्याला 70 हजार रुपये, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Modi Government | कमी भांडवल आणि अधिक नफा असा व्यवसाय (Business) केल्याने त्याचा अधिक लाभ आपणाला मिळतो. त्यातच मोदी सरकार (Modi Government) सुद्धा या व्यवसायासाठी मदत करणार आहे. हा व्यवसाय कसा आहे ते जाणून घ्या. हा व्यवसाय म्हणजे डेअरी प्रॉडक्ट्स (Dairy Products) चा व्यवसाय होय. डेअरी प्रॉडक्ट्सचा (Dairy Products) वापर हा दररोज केला जात असल्याने या व्यवसायात नुकसान होण्याची चिन्हे क्षुल्लक आहेत. फक पाच लाख रुपये गुंतवणूक (Investment) करून प्रत्येक महिन्याला 70 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न या व्यवसायातून मिळू शकणार आहे. दरम्यान हा व्यवसाय कसा सुरु करायचा त्याचं व्यवस्थापन काय? ते जाणून घ्या.

मुद्रा लोन (PMMY) योजनेअंतर्गत मिळणार कर्ज –

कुठलाही व्यवसाय सुरू करण्यासाठी सगळ्यात पहिला भांडवलाची आवश्यकता असते. व्यक्तीकडे जर व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल नसेल, तरी चिंता करण्याचं कारण नाही. कारण केंद्राच्या पंतप्रधान मुद्रा योजना (PMMY)अंतर्गत भांडवलाची उपलब्धता होते. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार भांडवलाबरोबर व्यवसायाबाबत पूर्ण माहिती देते.

गुंतवणीच्या 70 टक्के मिळणार कर्ज –

डेअरी प्रॉडक्ट्स (Dairy Products) हा व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवलापैकी 70 टक्के रक्कम ही मुद्रा लोन योजनेतुन बँकेतून मिळते.

5 लाख रुपये स्वतःची गुंतवणूक –

डेअरी प्रॉडक्ट्स (Dairy Products) हा व्यवसाय कारण्यासाठी प्रोजेक्ट प्रोफाइलप्रमाणे एकूण 16 लाख 50 हजार रुपयांपर्यंत प्रकल्प उभारणीला खर्च येऊ शकतो. यापैकी केवळ पाच लाख रुपयांची गुंतवणूक ही स्वतः ला करावी लागते.

काय आहे Project?

पंतप्रधान मुद्रा योजनेच्या (PMMY) प्रोजेक्टनुसार या व्यवसायात एका वर्षात 75 हजार लिटर दुधाची विक्री होऊ शकते.
याव्यतिरिक्त 36 हजार लिटर दही, 90 हजार लिटर लोणी आणि 4500 किलो तूप देखील तयार करून विकता येऊ शकते.
दरम्यान 82 लाख 50 हजार रुपयांची या व्यवसायात उलाढाल होईल.
ठयामध्ये सुमारे 74 लाख रुपये खर्च येणार आहे. बाकीच्या रक्कमेतून 14 टक्के व्याजाचे पैसे बाजूला काढले तरी देखील साधारण 8 लाखांचे उत्पन्न मिळणार आहे.

1000 स्केअर फूट जागेची गरज –

डेअरी प्रॉडक्ट्स (Dairy Products) हा व्यवसाय सुरू करण्यासाठी 1000 स्केअर फूट जागेची गरज आहे. यात 500 स्केअर फूट जागा ही दूध प्रक्रिया प्रकल्पासाठी लागेल.
तर, रेफ्रिजरेशन रूमसाठी 150 स्केअर फूट,
वॉशिंग क्षेत्रासाठी 150 स्केअर फूट, कार्यालयासाठी 100 स्केअर फूट,
तर उर्वरित जागेत शौचालय व अन्य सुविधा करता येणार आहे.

Web Title :  Modi Government | invest 5 lakh in dairy product business and earn 70 thousand per month

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 243 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Reliance Jio ने आणला सर्वात स्वस्त प्लान, यामध्ये एक प्लान रिचार्ज केल्यास दोन प्लानचा मिळेल फायदा, जाणून घ्या डिटेल

Pimpri Crime | उद्योजक नानासाहेब गायकवाड आणि साथिदारांवर सावकारीचा व खंडणीचा गुन्हा दाखल