अयोध्या भव्य बनवण्यासाठी मोदी सरकार बनवतंय ’मास्टर प्लॅन’, जाणून घ्या काय-काय बनवणार

नवी दिल्ली : अयोध्येला जगातील सर्वात मोठे धार्मिक स्थळ आणि पर्यटन नगर म्हणून विकसित करण्यासाठी भारत सरकारची विविध मंत्रालये मिळून मास्टर प्लॅनवर काम करत आहेत. अयोध्येबाबत रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने सुद्धा काही खास योजना बनवल्या आहेत. ही योजना आहे अयोध्येत रस्त्यांचे जाळे निर्माण करण्याची.

प्रभू श्रीरामाच्या जन्मस्थळापासून त्यांचा वनवास आणि माता जानकीचे जन्मस्थळ जनकपुरपर्यंत रस्त्यांचे जाळे निर्माण करण्याचा रोड मॅप तयार केला आहे.

1. राम जानकी मार्ग –
अयोध्येत श्री राम जन्मभूमी ते सीता मातेचे जन्मस्थळ जनकपुरपर्यंत राम जानकी मार्ग निर्माण करण्यात येत आहे. 218 किलोमीटर लांबीचा हा रस्ता अयोध्येहून छावणी , कलवारी, बडहलगंज, बरहज , सिवान , चोकीआ , मधुबनी , सीतामढीहून नेपाळ बॉर्डर वरून जनकपुरपर्यंत जाईल. या मार्गानेच प्रभु श्रीराम स्वयंवरासाठी जनकपुरात गेले आणि सीता मातेशी विवाह करून परत अयोध्येत आले होते. या मार्गासाठी एकुण 506 कोटी रूपये खर्च येणार आहे.

2. राम वनगमन मार्ग –
प्रभू श्रीराम यांच्याशी संबंधीत अन्य ठिकाणांना आपासात जोडण्यासाठी रस्त्यांची निर्मिती केली जाईल. प्रभु श्रीराम वनवासादरम्यान ज्या रस्त्यांनी गेले होते, ते रस्ते जोडत 262 किलोमीटर राम वनगमन मार्ग तयार केला जात आहे, जो अयोगध्येला चित्रकूटशी जोडेल.

हा मार्ग अयोध्या ते फैजाबाद, सुल्तानपुर, प्रतापगढ, जेठवारा, श्रृंगवेरपुर , मंझनपुर, राजपुरहून चित्रकूटला पोहचेल. या रस्त्यासाठी 1800 कोटींचा खर्च येणार आहे.

84 कोस परिक्रमा मार्ग
सुमारे 275 किलोमीटरचा हा मार्ग आहे. तो सुद्धा जोडण्यासाठी एनएचएआयने सर्वे सुरू केला आहे. हा यूपीच्या 5 जिल्ह्यांत बस्ती, फैजाबाद, आंबेडकरनगर, बाराबंकी आणि गोंडामध्ये पसरलेला आहे. 84 कोसी यात्रेचे हिंदूंमध्ये मोठे महत्व आहे. असे मानले जाते की, 8400000 योनींमध्ये भटकण्यापासून वाचण्यासाठी अयोध्येची 84 कोसी यात्रा करावी. राजा दशरथाच्या काळात अयोध्या या 5 जिल्ह्यांत पसरलेली होती. सरकारची योजना आहे की, 84 कोस मार्गासोबत या 5 जिल्ह्यांतील धार्मिक स्थळेसुद्धा विकसित केली जातील.

याशिवाय रस्ते परिवहन मंत्रालयाने अयोध्या बायपासच्या सौंदर्यीकरणासाठी 55 कोटी मंजूर केले आहेत. अयोध्या शहरात प्रवेश करणार्‍या या बायपासला खास पद्धतीने तयार केले आहे. रस्त्याच्या मध्यभागी कारंजी आणि रामायणाशी संबंधीत प्रतिमा लावण्यात येतील.

अयोध्येला जोडणार्‍या लखनऊ गोरखपुर हायवेला 4 लेन वरून 6 लेन करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like