5 लाख केंद्रीय कर्मचार्‍यांना नोकरीवरून काढण्याच्या तयारीत सरकार ? मोदी सरकारनं केला ‘हा’ खुलासा

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस लॉकडाऊन दरम्यान सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या अफवा पसरत आहेत. सोशल मीडियावर एक बातमी वायरल होत आहे की, केंद्र सरकार 5 लाख केंद्रीय कर्मचार्‍यांना नोकरीवरून काढून टाकण्याच्या तयारीत आहे. व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकवर शेयर होत असलेल्या या मॅसेजची सत्यता पीआयबीच्या फॅक्ट चेक टीमने सांगितली आहे.

जाणून घ्या काय केला जातोय दावा

सोशल मीडियावर एका वर्तमानपत्राचे कटींग वायरल होत आहे. ज्याचे हेडिंग आहे – 5 लाख केंद्रीय कर्मचार्‍यांना काढण्याची तयारी. बातमीत दावा केला आहे की, केंद्र सरकार 5 लाख केंद्रीय कर्मचार्‍यांना नोकरीवरून काढण्याची तयारी करत आहे.

हे आहे वायरल मॅसेजचे सत्य

पीआयबीच्या फॅक्ट चेक टीमनुसार, ही बातमी निराधार आणि चुकीची आहे. अशा चिथावणीखोर बातम्यांपासून सावध राहा. ही फेक न्यूज आहे. सरकार अशा कोणत्याही प्रस्तावाच्या विचारात नाही.

सध्या भारतात कोरोनाचा कहर थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसत आहे. भारतात कोविड-19 ची आतापर्यंत सुमारे 2 लाख 87 हजार प्रकरणे दाखल झाली आहेत. मृत्यूचा आकडा वाढून 8,102 झाला आहे. तर दिलसादायक बाब म्हणजे आतापर्यंत एकुण 1 लाख 41 हजारच्या जवळपास कोरोना मरीज बरे झाले आहेत. जगभरात कोरोना संक्रमितांचा आकडा वाढून 70 लाखपेक्षा सुद्धा जास्त झाला आहे.