‘शेती विधेयका’नंतर आता मोदी सरकार हमीभावाबद्दल मोठा निर्णय घेण्याची शक्यता !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शेती विधेयकाला राज्यसभेत मंजुरी मिळाल्यानंतर आता देशभरात याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. अशातच आता मोदी सरकार MSP (Minimum Support Price) वस्तूंच्या हमीभावाबद्दल निर्णय घेण्याची शक्यता आहे. केंद्रीय कॅबिनेट बैठकीत यासंदर्भात निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

2020-21 च्या रब्बी हंगामात हमी भावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. आज दुपारी 1.30 वाजतचा यावर कॅबिनेटची बैठक होणार होती.

जर हा निर्णय झाला तर गहू, जवसाच्या हमीभावात मोठी वाढ होऊ शकते. तर कडधान्याच्या हमीभावात तब्बल 7.4 टक्क्यांची वाढ करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

कृषीमूल्य आयोगानं गव्हाच्या किंमतीत वाढ करण्याची शिफारस केली आहे. गव्हाच्या हमीभावात वाढ करण्याचा मोठा निर्णय होऊ शकतो. उत्तर भारतात शेतकरी विधेयकाला असलेल्या निर्णयाच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय होण्याची चिन्ह आहेत.

गव्हाला 85 रुपये प्रति क्विंटल भाव वाढीची शिफारस करण्यात आली आहे. गव्हाला एमएसपी 2019-20 मध्ये 1840 रुपये प्रति क्विंटल भाव होता. तो वाढवून 1925 रुपये प्रति क्विंटल करावा अशी शिफारस करण्या आली आहे. हरभऱ्याच्या भावात 255 रुपये वाढ करून 4875 रुपये प्रति क्विंटल करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

सर्वाधिक हमी भाववाढ ही डाळीत करण्यात आली आहे. यात 7.3 टक्के एवढी वाढ करण्याची शिफारस करण्यात आली आहे.